मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना घरात बसून परीक्षा देता यावी, असा आमचा आग्रह होता. या आग्रहाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांना दिली आहे.
अंतिम वर्षांच्या परीक्षा कधी आणि कशा घ्यायच्या या विषयावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तणपुरे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकरदेखील उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
घरात बसून परीक्षा घेण्याच्या पद्धती तीन ते चार प्रकारच्या आहे. ऑनलाईन, ऑफलाईन, MCQ असे अनेक प्रकार आहेत. याबाबत अंतिम अहवाल आज रात्रीपर्यंत तयार होणार आहे. हा अहवाल उद्या शुक्रवारी शासनाकडे प्राप्त होईल. उद्या शासनाकडे अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोणतीही मुदत न घेता तो अहवाल तातडीने विद्यापीठांकडे पाठवू”, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
आम्ही सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन युजीसीला परीक्षेची तारीख वाढवण्याबाबत विनंती करु. 31 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सगळे निकाल जाहीर करु शकतो, अशी भूमिका कुलगुरुंनी घेतली आहे. त्याबाबतचा पाठपुरावा आम्ही यूजीसीकडे देऊ”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
ऑक्टोबर महिन्यात निर्णय घेऊन 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल द्यावा, अशा पद्धतीच्या सूचना महाराष्ट्र सरकारच्यावतीने आम्ही कुलगुरुंना केल्या आहेत. आज कुलपती म्हणून राज्यपालांनीदेखील त्याच सूचना कुलगुरुंना केल्या आहेत.
आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र, परीक्षा नेमक्या कशा पद्धतीने घेणार, याबाबत उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात येईल. अतिशय चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या वातावरणात विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातील”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
* आॕक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात परीक्षा
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होतील. परीक्षेच्या तारखा विद्यापीठ त्यांच्या बोर्डात जाऊन निश्चित करणार आहेत. तारखा निश्चित झाल्यावर जाहीर करु. पण विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होतील, असं गृहित धरायला हरकत नाही”, असं उदय सामंत यांनी सांगितले.
15 ते 30 सप्टेंबर या कालावधीत प्रॅक्टिकल परीक्षा सोप्या पद्धतीने घेण्याचं नियोजन कुलगुरु घेत आहेत. प्रॅक्टिकल परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लॅबमध्ये जावं लागू नाही, अशा सूचना केल्या होत्या. त्याचप्रकारे अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालाची माहिती उद्या दिली जाईल”, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.