Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: इराण- इस्रायल युद्ध पेटले, अमेरिकेचे ४० हजार सैन्य अलर्टवर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

इराण- इस्रायल युद्ध पेटले, अमेरिकेचे ४० हजार सैन्य अलर्टवर

admin
Last updated: 2025/06/19 at 7:08 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

वॉशिंगटन डीसी, 19 जून (हिं.स.)।इराण इस्त्रायल यांच्यातील संघर्ष युद्धात परिवर्तीत झाला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर घातक हल्ले करण्यात येत आहेत. अलीकडेच इराणच्या सैन्याने इस्त्रायलमधील बीर्शेबा येथील एका हॉस्पिटलला टार्गेट केले. या हल्ल्यात हॉस्पिटलचे प्रचंड नुकसान झाले असून कमीत कमी ६५ जण जखमी झाल्याचे इस्त्रायली आपत्कालीन सेवेकडून सांगण्यात आले.या सर्व घडामोडीवर आता अमेरिकेने संयुक्त अरब अमीरात, सौदी अरब आणि जॉर्डनसह इतर मध्य पूर्वेतील देशांमध्ये ४० हजार सैन्य जवानांना अलर्टवर ठेवले आहे.

इराण- इस्त्रायल यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणच्या शेजारील मुस्लीम देश आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये ४० हजार सैन्य जवानांना अलर्टवर ठेवले आहे. यामध्ये संयुक्त अरब अमीरात, सौदी अरब आणि जॉर्डनसह मध्य पूर्वेतील देशांचा समावेश आहे. इतर अमेरिकन अधिकारी अशा ठिकाणांची माहिती घेत आहेत जिथे इराण हल्ला करू शकते. मध्य पूर्व आणि आसपास अमेरिकन सैन्याचे जवळपास २० तळ आहेत. त्यातील बहुतांश सैन्य तळ इराणी बॅलेस्टिक मिसाईलच्या रेंजमध्ये आहेत. इराणविरोधातील यु्द्धात उतरताच सर्वात आधी सीरिया, इराक आणि अरब देशांतील त्यांच्या सैन्य तळांना टार्गेट केले जाऊ शकते अशी शंका अमेरिकन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अमेरिका या सैन्य तळांवर अमेरिकन जवान तैनात ठेवले आहेत. अमेरिकेने युरोपात १८ रिफ्लुलिंग एअरक्राफ्ट्स पाठवले आहेत. जे लढाऊ विमानाच्या मदतीसाठी सज्ज राहतील. त्यासोबतच अमेरिकेने २ मालवाहू युद्धनौका मध्य पूर्व सागरी क्षेत्रात पाठवल्या आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. परंतु याबाबत अंतिम आदेशाला अद्याप मंजुरी दिली नाही. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून इराणच्या हालचालींवर बारीक लक्ष आहे. त्यातच अमेरिकेने इराणविरोधात डाव आखणे सुरू केले आहे. इराणच्या शेजारील मुस्लीम देशांसोबत मिळूनच अमेरिका इराणविरोधात चक्रव्यूह आखत आहे. इस्त्रायल आणि इराण युद्धात अमेरिकेचे सैन्य उतरले तर इराणही अमेरिकेवर पलटवार करू शकतो हे अमेरिकेला माहिती आहे. इराण जवळच्या देशांमधील अमेरिकन बेसवर हल्ला करू शकते. त्यातूनच वाचण्यासाठी अमेरिकेने मुस्लीम देशांमध्ये पूर्ण तयारी केली आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – स्वरूप भाळवणकर
Next Article राज्यातील शाळांमध्ये होणार मोबाईल बंदी ? शिक्षक सुधीर केनेंचे संशोधन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?