Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारतीय संघाच्या मिशन इंग्लंडला उद्यापासून सुरुवात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

भारतीय संघाच्या मिशन इंग्लंडला उद्यापासून सुरुवात

admin
Last updated: 2025/06/19 at 7:13 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

लंडन, 19 जून (हिं.स.) :

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम

इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला उद्यापासून खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. भारत

आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांपेकी पहिला कसोटी सामना हा लीड्समध्ये

खेळवला जाणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्र अश्विन यांच्या

निवृत्तीनंतर भारतीय संघाचा हा पहिलाच मोठा दौऱा आहे.

युवा कर्णधार शुममन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या

टीम इंडियाला २००७ नंतर इंग्लंडमध्ये

कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे १८ वर्षानंतर हा इतिहास गिलचा संघ

बदलण्यात यशस्वी ठरणार का याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे.

इंग्लंडमधील खेळपट्ट्या या कायमच वेगवान

गोलंदाजांसाठी नंदनवन ठरतात. त्यामुळे भारतीय फलंदाजांसाठी ही कसोटी मालिका एक अग्निपरीक्षाच

ठरणार आहे. सलामीवीर यशस्वी जयस्वाल ऑस्ट्रेलियात यशस्वी ठरला होता. त्यामुळे

त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा असतील. भारतीय संघाची फलंदाजीची भिस्त यशस्वी

जयस्वाल, के.एल. राहुल, शुभमन गिल, ऋषभ पंत आणि संधी मिळाल्यास साई सुरदर्शनवर

असणार आहे. तर करुण नायर दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय गोटात चिंतेचें वातावरण

आहे.

भारतीय संघाच्या गोलंदाजीची धुरा ही जसप्रीत

बुमराहवर असणार आहे. आता त्याच्या साथीला संघात मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा हे

गोलंदाज असतीलच. शिवाय संघात फिरकी गोलंदाज रविंद्र जाडेजाबरोबरच कुलदिप यदवला संधी

मिळणार का हा सवालही उपस्थित झाला आहे. त्याचप्रमाणे शार्दुल ठाकूर आणि नितीश

कुमार रेड्डी या दोघांपैकी अंतिम अकरामध्ये कुणाला सधी द्यावी हा यक्ष प्रश्न

कर्णधार शुभमन गिलसमोर निर्माण झाला आहे. आता टीम इंडिया या कसोटी मालिकेची

सुरुवात विजयी सलामी देत करणार का ते पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यातील शाळांमध्ये होणार मोबाईल बंदी ? शिक्षक सुधीर केनेंचे संशोधन
Next Article इराणमधून ११० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारतात परतली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?