Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: इराणमधून ११० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारतात परतली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

इराणमधून ११० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारतात परतली

admin
Last updated: 2025/06/19 at 7:14 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 19 जून (हिं.स.)।इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने तेथे राहणाऱ्या हजारो भारतीयांना सुरक्षित परत आणण्‍यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे.त्यानुसार, इराणमधून आणण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिली तुकडी गुरुवारी(दि.१९) सकाळी भारतात पोहोचली. पहिल्या तुकडीत ११० हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

इराणमध्‍ये अडकलेल्या ११० भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे एक विशेष विमान दिल्ली विमानतळावर उतरले. दरम्‍यान, ४,००० हून अधिक भारतीय नागरिक इराणमध्ये राहत आहेत आणि त्यापैकी निम्मे विद्यार्थी आहेत. उत्तर इराणमधून ११० विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे आर्मेनियाला आणण्यात आले. दरम्‍यान, विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सरकारच्या या कारवाईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, इराणमधील भारतीय दूतावास मोठ्या संख्येने भारतीय नागरिकांना आर्मेनियाची राजधानी येरेवनमध्ये बाहेर काढण्यास मदत करत आहे. इराणमधील भारतीय नागरिकांना तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या आपत्कालीन हेल्पलाइन आणि नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाने स्थापन केलेल्या २४x७ नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आल्‍याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्‍हटले आहे.

इराण आणि इस्रायलमधील चालू घडामोडी लक्षात घेता, परराष्ट्र मंत्रालयात २४x७ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाशी या क्रमांकांवर संपर्क साधता येईल – १८००११८७९७ (टोल-फ्री) +९१-११-२३०१२११३ +९१-११-२३०१४१०४ +९१-११-२३०१७९०५ +९१-९९६८२९१९८८ (व्हॉट्सअॅप). याशिवाय, situationroom@mea.gov.in या ईमेल आयडीवर देखील संपर्क साधता येतो.

तेहरानमधील भारतीय दूतावासाने २४x७ आपत्कालीन हेल्पलाइन स्थापन केली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आणि संपर्क तपशील शेअर केले. त्यात म्हटले आहे की, फक्त कॉलसाठी: +९८ ९१२८१०९११५, +९८ ९१२८१०९१०९; व्हाट्सअ‍ॅपसाठी: +९८ ९०१०४४५५७, +९८ ९०१५९९३३२०, +९१ ८०८६८७१७०९; बंदर अब्बास: +९८ ९१७७६९९०३६; झाहेदान: +९८ ९३९६३५६६४९ आणि cons.tehran@mea.gov.in वर ईमेल करावा, असे आवाहन केले आहे. इराणमधून आणण्यात आलेल्या लोकांमध्ये यासिर गफ्फार नावाच्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, आम्ही रात्रीच्या वेळी क्षेपणास्त्रे उडताना पाहिली आणि मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. भीतीचे वातावरण होते, पण आता भारतात पोहोचल्यानंतर आम्हाला दिलासा मिळाला आहे.

एका विद्यार्थ्याने सांगितले की, इराणमधील परिस्थिती दररोज बिकट होत चालली आहे, विशेषतः तेहरानमधील परिस्थिती खूप गंभीर आहे. सर्व भारतीय विद्यार्थ्यांना तेथून बाहेर काढले जात आहे. भारतीय अधिकारी चांगले काम करत आहेत. आम्हाला सर्वांना सुरक्षित ठिकाणी पाठवले जात आहे.प्रथम विद्यापीठातून आर्मेनियाला नेण्यात आले, त्यानंतर तेथून त्याला कतारला पाठवण्यात आले. शेवटी तो भारतात पोहोचला.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारतीय संघाच्या मिशन इंग्लंडला उद्यापासून सुरुवात
Next Article पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?