Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अहमदाबाद : विमान अपघातातील २१५ मृतदेहांची ओळख पटली, १९८ मृतदेह नातेवाइकांना सुपूर्द
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

अहमदाबाद : विमान अपघातातील २१५ मृतदेहांची ओळख पटली, १९८ मृतदेह नातेवाइकांना सुपूर्द

admin
Last updated: 2025/06/20 at 4:50 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अहमदाबाद, 20 जून (हिं.स.)।अहमदाबादमध्ये घडलेल्या एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २७० पैकी, आतापर्यंत २१५ मृतदेहांची ओळख डीएनए चाचणीद्वारे पटवण्यात आली असून त्यातील १९८ मृतदेह नातेवाइकांच्या हवाली करण्यात आले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.

लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया फ्लाईट एआय-१७१मध्ये २४२ प्रवासी व कर्मचारी होते. हे विमान उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच अहमदाबादच्या मेघाणीनगर भागातील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले आणि भीषण आगीत भस्मसात झाले. विमानातील एक व्यक्ती वगळता बाकी सर्व लोकांचा मृत्यू झाला. तसेच वसतिगृह परिसरातील २९ लोकही मरण पावले. दरम्यान, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी २१५ मृतदेहांची ओळख डीएनए चाचणीद्वारे पटवण्यात आली असून त्यातील १९८ मृतदेह नातेवाइकांच्या हवाली करण्यात आले आहे.

या अपघातग्रस्त विमानाबाबत एअर इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी गुरुवारी(दि.१९) सांगितले की, अपघातग्रस्त बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर या विमानाची व्यवस्थित देखभाल करण्यात येत होती. जून २०२३मध्ये त्याची बारकाईने तपासणी करण्यात आली होती. तसेच पुढील तपासणी डिसेंबर २०२५मध्ये होणार होती. विमानाचे उजवे इंजिन यंदाच्या वर्षी मार्चमध्ये, तर डावे इंजिन एप्रिलमध्ये तपासण्यात आले होते. तसेच उड्डाणापूर्वी या विमानात कोणताही दोष आढळून आला नव्हता.

एअर इंडिया विमानाला झालेल्या अपघाताला एक आठवडा उलटला असला तरी विमानाच्या शेपटासह अन्य अवशेषांचा ढिगारा अद्याप अपघातस्थळी तसाच पडून आहे. या दुर्घटनेच्या तपासाचे काम गुजरात सरकारकडे नसून त्यांचे अग्निशमन कर्मचारी, न्यायवैद्यकीय तज्ज्ञ केंद्राच्या यंत्रणांना मदत करणार आहेत.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एका नवीन क्रांतीची सुरुवात बारामतीतून – शरद पवार
Next Article खामेनी यांचे अस्तित्व संपवून टाकण्याचा इस्रायलचा लष्कराला आदेश

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?