Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: खामेनी यांचे अस्तित्व संपवून टाकण्याचा इस्रायलचा लष्कराला आदेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

खामेनी यांचे अस्तित्व संपवून टाकण्याचा इस्रायलचा लष्कराला आदेश

admin
Last updated: 2025/06/20 at 4:52 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

जेरुसलेम , 20 जून (हिं.स.)।इराणने इस्रायलमधील बेर्शेबा शहरातील सोरोका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात रुग्णालय इमारतीचे मोठे नुकसान झाले असून ४० जण जखमी झाले आहेत. त्यामुळे संतप्त झालेले इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्राएल कात्झ यांनी सांगितले की, इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी यांचे अस्तित्व संपवून टाकण्याचा आदेश आमच्या लष्कराला देण्यात आला असून इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचा भाग असलेल्या अराक हेवी वॉटर अणुऊर्जा प्रकल्पावर देखील हल्ला केला आहे.

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची युरोपीय देशांतील परराष्ट्र मंत्र्यासमवेत जिनिव्हा येथे बैठक घेणार असून इस्रायलने सुरू केलेल्या संघर्षाबाबत इराण हा ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी व युरोपियन युनियनचे प्रमुख पदाधिकारी यांच्याकडे भूमिका मांडणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच म्हटले होते की, इस्रायल-इराणमध्ये आम्हाला केवळ शस्त्रसंधी नको आहे तर त्यापेक्षाही मोठा निर्णय होणे अपेक्षित आहे. तसेच या युद्धात अमेरिकेच्या संभाव्य सहभागाची शक्यता त्यांनी फेटाळली नाही. त्यावर इराणने इशारा दिला की, अमेरिकेने या संघर्षात हस्तक्षेप केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

इस्रायलने इराणच्या अरक हेवी वॉटर अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला करण्याच्या काही तासांपूर्वी इस्रायली आर्मीने अरक आणि खोंडूब शहरांतील लोकांना हा परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला होता. अरकमधील एक हेवी वॉटर रिॲक्टर हा इराणच्या अणुकार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यासोबतच अरकमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रे तयार केली जातात. याशिवाय, खोंडूबमध्ये एक आयआर-४० हेवी वॉटर रिॲक्टर देखील आहे, जो इराणच्या अणुकार्यक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. हा रिॲक्टर अरकपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे. अरकप्रमाणेच, त्यावर आंतरराष्ट्रीय देखरेख आहे.

इस्रायलमधील बेर्शेबा शहरातील सोरोका रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाची जुनी इमारत इराणशी सुरू झालेल्या संघर्षानंतर रिकामी करण्यात आली होती. या रुग्णालयात सध्या फक्त प्रकृती चिंताजनक असलेल्यांवर उपचार करण्यात येत आहेत. इराणमध्ये आतापर्यंत ६३९ जण मृत्युमुखी पडले असून, त्यात २६३ नागरिकांचा समावेश आहे, तसेच १,३०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अहमदाबाद : विमान अपघातातील २१५ मृतदेहांची ओळख पटली, १९८ मृतदेह नातेवाइकांना सुपूर्द
Next Article बँक अध्यक्ष बच्चू कडूंची अपात्रता, हायकोर्टात 24 जूनला सुनावणी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?