Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी 14 जणांचा मृत्यू तर नव्याने 442 कोरोनाबाधित
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी 14 जणांचा मृत्यू तर नव्याने 442 कोरोनाबाधित

Surajya Digital
Last updated: 2020/09/04 at 10:13 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात काल गुरुवारी 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर नव्याने 442 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात 783 जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांची संख्या आता 19 हजार 324 वर पोहोचली आहे. गुरुवारअखेर आणखी 305 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

जिल्ह्यातील 1 लाख 64 हजार 168 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 लाख 63 हजार 861 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1 लाख 44 हजार 536 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणखी 305 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गुरुवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 2 हजार 595 जणांची तपासणी करण्यात आली.त्यापैकी 2 हजार 210 जण निगेटिव्ह, तर 384 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ग्रामीण भागातील 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 135 जण कोरोनामुक्‍त होऊन घरी परतले आहेत.

सोलापूर शहरातील 1041 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 983 निगेटिव्ह, तर 58 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तीनजणांचा मृत्यू झाला आहे. 147 जण कोरोनामुक्‍त होऊन घरी परतले आहेत.

* शहर – ग्रामीण कोरोनाबळी

गुरुवारी मृत्यू झालेल्यांमध्ये बार्शी तालुक्यातील धामणगाव येथील 70 वर्षीय महिला, पंढरपूर शहरातील हनुमान मंदिरजवळील 69 वर्षीय पुरुष, मोहोळ तालुक्यातील गावडे वस्ती येथील 60 वर्षीय पुरुष, बार्शी शहरातील आदर्शनगर भागातील 76 वर्षीय महिला, माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील 70 वर्षीय महिला, मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ भागातील 72 वर्षीय महिला, माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथील 60 वर्षीय महिला, माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील 56 वर्षीय महिला, नातेपुते येथील 65 वर्षीय महिला, पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील 38 वर्षीय पुरुष, चारी येथील 56 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. शहरातील कर्णिकनगर भागातील 82 वर्षीय पुरुष, आदित्यनगर विजापूर रोड परिसरातील 52 वर्षीय पुरुष, शिवयोगीनगर, जुळे सोलापूर भागातील 69 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #सोलापूर #जिल्हा #कोरोना #14मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगलीत कोरोनाचा कहर; आजही 24 कोरोनाबळी तर नव्याने 716 रुग्ण, रुग्णसंख्या गेली साडेचौदा हजार पार
Next Article थकीत कर्जदारांना दिलासा : अशा कर्जखात्यांना ‘एनपीए’ म्हणून घोषित करण्यास सर्वोच्च न्यायालयाची तूर्त मनाई

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?