Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाण्यापासून होणार ग्रीन-हायड्रोजनची निर्मिती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पाण्यापासून होणार ग्रीन-हायड्रोजनची निर्मिती

admin
Last updated: 2025/06/22 at 3:31 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केले उपकरण

बंगळुरू, 22 जून (हिं.स.) : भारताने आगामी 2070 पर्यंत ‘नेट-झिरो’ कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य निश्चित केले असून, या दिशेने निर्णायक पावले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून भारतीय शास्त्रज्ञांनी सौर ऊर्जेचा वापर करून पाण्यापासून ग्रीन-हायड्रोजन तयार करणारे अभिनव उपकरण विकसित केले आहे.

ग्रीन-हायड्रोजन हे सर्वात स्वच्छ आणि भविष्यातील इंधन म्हणून ओळखले जाते. याचा उपयोग वाहतूक, उद्योग आणि ऊर्जा साठवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. मात्र, आतापर्यंत ही प्रक्रिया महागडी आणि तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीची होती. सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या स्वायत्त संस्थेतील शास्त्रज्ञांच्या पथकाने हे यशस्वी उपकरण तयार केले आहे. या उपकरणाद्वारे केवळ सौर ऊर्जा आणि पृथ्वीवर सहज उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर करून पाण्याच्या रेणूंपासून ग्रीन-हायड्रोजन तयार करणे शक्य झाले आहे. हे उपकरण अल्कधर्मी परिस्थितीत 10 तासांपेक्षा जास्त काळ कार्यरत राहिले असून, त्याच्या कामगिरीत केवळ 4 टक्के घट झाली – जी आजच्या घडीला दुर्मीळ मानली जाते.

संशोधकांचे नेतृत्व करणारे डॉ. आशुतोष के. सिंह म्हणाले, “स्मार्ट मटेरियल्सची निवड करून, आम्ही एक असे हेटरोजंक्शन डिझाइन तयार केले आहे जे कार्यक्षमता वाढवत असून, मोठ्या प्रमाणात ग्रीन-हायड्रोजन निर्माण करू शकते.”

त्यांच्या नेतृत्वाखालील टीमने एनआयपी (NIP) हेटरोजंक्शन आर्किटेक्चर वापरून सिलिकॉन-आधारित फोटोएनोड तयार केला. यामध्ये एन-टाइप टीआयओ₂, अनडोप्ड एसआय, आणि पी-टाइप एनआयओ यांचे थर असून, हे एकत्रितपणे चार्ज वाहतूक सुधारण्यासाठी काम करतात.

उपकरणाने 600 एमव्ही फोटोव्होल्टेज प्राप्त केले आहे, जे सौर ऊर्जेच्या साहाय्याने उच्च कार्यक्षमतेने हायड्रोजन निर्मितीस सक्षम करते. जर्नल ऑफ मटेरियल्स केमिस्ट्री ए मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले असून, भविष्यातील सौर ऊर्जा ते हायड्रोजन ट्रान्झिशनसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.संशोधकांच्या मते, हे उपकरण घरांपासून ते उद्योगांपर्यंत हायड्रोजन-आधारित ऊर्जा प्रणाली घडवण्याची क्षमता ठेवते आणि देशाच्या स्वच्छ ऊर्जा स्वप्नात एक महत्त्वाचा वाटा उचलू शकते.

————————–

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इस्रायलने इराणच्या लढाऊ विमानांवर केला हल्ला
Next Article अमेरिकेच्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र चिंतीत

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?