Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: इराणवरील हल्ल्यावरून रशिया, चीनची अमेरिकेवर टिका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

इराणवरील हल्ल्यावरून रशिया, चीनची अमेरिकेवर टिका

admin
Last updated: 2025/06/23 at 3:07 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

वॉशिंग्टन , 23 जून (हिं.स.)। इराणमधील अणुकेंद्रांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. तसेच अमेरिकेने उचललेल्या या पावलावर अनेक देशांकडून टीका होत आहे.या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बोलावण्यात आलेल्या आपातकालीन बैठकीमध्येही याचे पडसाद उमटले. तसेच यामध्ये रशिया, चीन आणि पाकिस्तानने १५ सदस्यीय परिषदेमध्ये एक मसुदा सादर करून, पश्चिम आशियामध्ये तातडीने युद्धविराम घोषित करण्याची मागणी केली.

अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचा रशिया आणि चीनने तीव्र शब्दात निषेध केला आहे. चीनचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत फू कोंग म्हणाले की, पश्चिम आशियामध्ये बळजबरीने शांतता प्रस्थापित करता येणार नाही. सद्यस्थितीत संवाद आणि चर्चेच्या माध्यमातूनच यावर तोडगा निघू शकतो. इराणच्या आण्विक प्रश्नावर मुत्सद्देगिरीचा मार्ग अद्याप संपुष्टात आलेला नाही. तसेच शांततेचा मार्ग अद्यापही खुला आहे.

तर रशियाचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत वासिली नेबेजिया यांनी या हल्ल्याची तुलना २००३ इराक युद्धाशी केली. ते म्हणाले की, पुन्हा एकदा आपल्याला अमेरिकेच्या काल्पनिक कहाण्यांवर विश्वास ठेवण्यास सांगितलं जात आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील लाखो लोकांना त्रासाचा सामना करावा लागेल. अमेरिकेने भूतकाळातून काहीच धडा घेतलेला नाही, हेच यावरून सिद्ध होत आहे, असा टोलाही रशियाकडून लागवण्यात आला.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस या बैठकीच्या सुरुवातीला म्हणाले होते की, इराणच्या अणुकेंद्रावर अमेरिकेने केलेला हल्ला हे एक धोकायदायक वळण आहे. हा संघर्ष थांबवण्यासाठी आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर त्वरित चर्चा करण्यासाठी आपण त्वरित आणि निर्णायक कारवाई केली पाहिजे.तर अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांतील कार्यवाहक राजदूत डोरेथी शिया यांनी सांगितले की, आता निर्णायक कारवाईची वेळ आली आहे. इराणने इस्राइलला संपवण्याचे आणि अणुबॉम्ब तयार करण्याचे प्रयत्न सोडून द्यावेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने इराणला सांगावे, असं आवाहनही त्यांनी केलं. तसेच इराण दीर्घकाळापासून आपला आण्विक कार्यक्रम लपवत आहे, असा दावाही त्यांनी केला.

You Might Also Like

बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता

आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा

इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी

ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती

इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स कसोटी रंगतदार अवस्थेत
Next Article सीरियाच्या दमास्कस चर्चमध्ये बॉम्बस्फोटात २२ जणांचा मृत्यू

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?