Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी

admin
Last updated: 2025/06/23 at 6:00 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

तेहरान , 23 जून (हिं.स.) : इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रांवर हवाई हल्ले केले. अमेरिकेच्या हल्ल्याचा रशिया आणि चीनसह अनेक देशांनी निषेध केला.दरम्यान, आता इराणचे लष्कर इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स ने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘जुगारी’ म्हटले असून, अमेरिकेला हल्ल्याची थेट धमकीही दिली आहे.

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे प्रवक्ते इब्राहिम झोल्फाघारी म्हणाले की, अमेरिकेने इराण आणि इस्रायलमधील युद्धात थेट प्रवेश करुन इराणच्या “पवित्र भूमी”चे उल्लंघन केले आहे. अमेरिकेला आता अत्यंत शक्तिशाली आणि लक्ष्यित ऑपरेशन्स द्वारे जबरदस्त आणि अनपेक्षित परिणामांना सामोरे जावे लागेल. अमेरिकेच्या अध्यक्षांना उद्देशून झोल्फाघारी म्हणाले, “मिस्टर ट्रम्प, जुगारी! तुम्ही हे युद्ध सुरू केले, पण ते आम्हीच संपवू..!” अशा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, अमेरिकेने रविवारी (22 जून) पहाटेच्या सुमारास इराणच्या, फोर्दो, नतांज आणि इस्फहान या तीन अणुकेंद्रांवर हवाई हल्ले केले. यामुळे इराणची अणु ठिकाणं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत,

असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. दरम्यान, ज्या कारवाईअंतर्गत इराणवर हा हल्ला करण्यात आला, त्या कारवाईला मिडनाईट हॅमर, असे नाव देण्यात आले होते, अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिली आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला केला. आम्ही इराणी अणुकार्यक्रम उद्ध्वस्त केला. मिडनाईट हॅमर ऑपरेशनअंतर्गत नागरिकांना अथवा इराणी सैनिकांना लक्ष्य करण्यात आले नाही.” याच बरोबर, “इराणने अमेरिकेविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या प्रत्युत्तराचा विचार केला, तर त्याला आणखी कठोर उत्तर दिले जाईल, असा इशाराही अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिला आहे.

You Might Also Like

बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता

आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा

ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती

इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार

सीरियाच्या दमास्कस चर्चमध्ये बॉम्बस्फोटात २२ जणांचा मृत्यू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
Next Article आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे – अनासपुरें
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?