Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता

admin
Last updated: 2025/06/23 at 6:07 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

ढाका , 23 जून (हिं.स.)।बांगलादेशात लेफ्टिनंट जनरल अबु तैयब मोहम्मद जहीरूल आलम यांची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली जाऊ शकते. जहीरूल आलमवर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हस्तक आणि भारतविरोधी भावना भडकवण्याचा आरोप आहे. जहीरूल आलम यांच्या नियुक्तीने बांग्लादेश आणि भारताचे संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशातील अंतरिम सरकार जहीरूल आलम यांना हे पद देऊ शकते. जहीरूल आलम, जहांगीर आलम यांचे वर्गमित्र आहेत, जे सध्या बांगलादेशात गृह सल्लागार म्हणून काम करतात. जहीरूल आलम खालिदा जिया यांचा दिवंगत भाऊ सईद इस्कंदरचा निकटवर्तीय होता. ही सर्व माणसे पाकिस्तानशी जवळीक असलेली मानली जातात. जहांगीर आलम २००१-२००६ या कालावधीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी शासन काळात सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख होते.

जहीरूल आलम यांचे पाकिस्तानशी चांगले संबंध आहेत. त्यांनी एकदा पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांना बांगलादेश नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये येण्याची परवानगी दिली होती. ते नॅशनल डिफेन्स कॉलेजचे कमांडेट राहिले आहेत. त्यानंतर त्यांना हमदर्द लॅबोरेटरीज बांगलादेश बोर्ड ऑफ ट्रस्टीजचे सदस्य बनवले गेले. जहीरूल आलम यांचे युनूस यांच्याशीही जवळचे संबंध आहेत. ते युनूस यांचे मूळगाव चटगावचे आहेत. त्यासाठी त्यांना बांगलादेशात डिफ्टी एनएसए बनवण्याची तयारी आहे. या नियुक्तीमुळे भारत आणि बांगलादेशातील संबंध आणखी बिघडतील असं ढाका येथील तज्ज्ञांचे मत आहे.

जहीरूल आलमचा निकटवर्तीय मेजर इस्कंदर हा खालिदा जियाचा छोटा भाऊ होता. तो २००१ ते २००६ या काळात बांगलादेशातील संसदेत खासदार होता. त्याशिवाय तो इस्लामिक टेलिविजनचा संस्थापक अध्यक्ष होता. त्याच्यावर भारताविरोधी आणि कट्टरपंथी ताकदींना प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे. इस्कंदरने २००१ साली बीएनपी निवडणुकीचा कारभार पाहिला होता. त्याचे २०१२ साली निधन झाले. इस्कंदरने मिझारोम, आसाम येथे कट्टरपंथींना शस्त्रे आणि प्रशिक्षण देण्यास मदत केल्याचे बोलले जाते.

—————

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Next Article crime सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?