मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सतत टीका आणि वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने अभिनेत्री कंगना राणावत चर्चेत आहे. दरम्यान मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने कंगना राणावतविरोधात सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. आता यात मनसेनेही उडी घेतली आहे. मुंबईचा विषय आल्यानंतर मनसेतरी मागे कशी राहणार.
बॉलिवूडसह मराठी सेलिब्रेटींनीही कंगनाच्या या वक्तव्याचा विरोध केला आहे. दुसरीकडे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये असं म्हटलं आहे. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही अशी असंही ते म्हणाले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अमेय खोपकर यांनी ट्विट केलं असून त्यात म्हटलं आहे की, “माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहेत माझे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो…कशीचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलीस.
ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही.