कुडलोर : तामिळनाडूतील कुड्डालोरमधील फटाक्यांच्या एका कारखान्यात स्फोट होऊन लागलेल्या आगीत सात महिलांचा मृत्यू झाला आहे. तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. कुडलोर जिल्ह्यातील कट्टुमनारकोली भागात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
ही घटना कुडलोर जिल्ह्यातील कट्टूमन्नारकोली भागात घडली आहे. हे ठिकाण चेन्नईपासून 190 किलोमीटर अंतरावर आहे. दिवाळी सणासाठी फटाक्यांची मोठी मागणी असते. त्यासाठी सकाळी फटाक्याच्या कारखान्यात संबंधित मालक, त्यांची मुलगी आणि सात महिला उपस्थित होत्या. याच दरम्यान कारखान्यात स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. यात सात महिलांचा मृत्यू झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या घनटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक प्रशासनाच्या मते या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कुडलोरचे पोलीस अधीक्षक एम श्री अभिनव यांनी या बाबत माहिती दिली आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू झाले असून, स्फोट नेमका कोणत्या कारणाने झाला याचा शोध घेतला जात आहे.

* गेल्यावर्षी पंजाबमध्ये स्फोट
गेल्या वर्षी पंजाब मधील बाटला येथील फटाक्यांच्या फॅक्टरीत झालेल्या स्फोटात तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला होता. तर 16 जण जखमी झाले होते. या भयंकर स्फोटात इमारतीला आग लावून ती कोसळली होती. हा कारखाना नवी दिल्ली पासून सुमारे 460 किमी अंतरावर होता.
