पॅराग्वे, 25 जून (हिं.स.) :
नीरज
चोप्राने 5 दिवसांत सलग दुसऱ्या सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. त्याने चेक
प्रजासत्ताकमधील ओस्ट्रावा येथे झालेल्या गोल्डन स्पाइक मीट स्पर्धेत अव्वल स्थान
पटकावलं. आणि सलग २४ व्यांदा पहिल्या दोन भालाफेकपटूंमध्ये स्थान मिळवले आहे.
पॅरिस
डायमंड लीग जिंकल्यानंतरनीरजने ओस्ट्रावामधील या स्पर्धेत ८५.२९ मीटरचा सर्वोत्तम भाला फेकला.
आणि त्याने गोल्डन स्पाइक मीटमध्ये अगदी सहज सुवर्णपदक जिंकला.
दक्षिण
आफ्रिकेच्या डाऊ स्मितने ८४.१२ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम फेक केली आणि अँडरसन
पीटर्सच्या पुढे दुसरे स्थान पटकावले. पीटर्सने ८३.६३ मीटरची सर्वोत्तम फेक केली. दरम्यान, नीरजला तुलनेने कमी अंतरावर फेकलेल्या भालाफेकीबाबत
फारशी काळजी वाटणार नाही. कारण ५ जुलै रोजी बंगळुरूमध्ये होणाऱ्या पहिल्या नीरज
चोप्रा क्लासिक स्पर्धेपूर्वी त्याचा विजयी फॉर्म कायम आहे. ही स्पर्धा
त्याच्यासाठी निश्चितच खूप भावनिक असणार आहे.