Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आणीबाणीच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

आणीबाणीच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल

admin
Last updated: 2025/06/25 at 3:57 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 25 जून (हिं.स.)।”आज भारताच्या लोकशाही इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असलेल्या आणीबाणीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात तत्कालीन काँग्रेस सरकारने लोकशाहीला वेठीस धरले होते, अशा शब्‍दांमध्‍ये आणीबाणीच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहलं आहे की, “आज भारताच्या लोकशाही इतिहासातील एका काळ्याकुट्ट पर्वाला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत – आणीबाणीची घोषणा. हा दिवस भारतातील जनता ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून ओळखते. या दिवशी भारतीय संविधानात नोंदवलेली मूल्ये बाजूला ठेवली गेली, मूलभूत अधिकार रद्द करण्यात आले, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले आणि अनेक राजकीय नेते, समाजसेवक, विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांना तुरुंगात डांबण्यात आले. जणू त्या काळात सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारने लोकशाहीलाच बंदिवासात टाकले होते.”

आपल्या संविधानाच्या भावनेचे झालेले उल्लंघन कोणताही भारतीय कधीही विसरू शकत नाही. संसदेचा आवाज दाबण्यात आला आणि न्यायालयांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ४२ वी घटनादुरुस्ती हे त्यांच्या कृतीचे प्रमुख उदाहरण आहे. गरीब, उपेक्षित आणि दलितांना विशेषतः लक्ष्य करण्यात आले होते.” तसेच आणीबाणीविरुद्धच्या लढ्यात ठामपणे उभ्या राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही सलाम करतो. हे लोक संपूर्ण भारतातून, प्रत्येक क्षेत्रातून, वेगवेगळ्या विचारसरणीतून आले होते. या सर्वांनी एकाच उद्देशाने एकत्र काम केले. भारताच्या लोकशाही संरचनेचे रक्षण करणे आणि ज्या आदर्शांसाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपले जीवन समर्पित केले. हाच आदर्श जपण्याचे त्यांचे ध्येय होते.

त्यांच्या या सामूहिक संघर्षामुळेच तत्कालीन काँग्रेस सरकारला लोकशाही पुनर्संचयित करावी लागली आणि नव्या निवडणुका घ्याव्या लागल्या, ज्यात त्यांचा दारुण पराभव झाला, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्‍हटले आहे. आम्ही आपल्या संविधानातील तत्त्वे अधिक दृढ करण्यासाठी आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहोत. आम्ही प्रगतीची नवी शिखरे गाठू आणि गरीब व वंचितांची स्वप्ने पूर्ण करू, अशी ग्‍वाहीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ऑपरेशन सिंधू : इराणमधून 282 भारतीय मायदेशी परतले
Next Article कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?