Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

admin
Last updated: 2025/06/25 at 4:06 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

अहिल्यानगर 25 जून (हिं.स.) :- 22 जून रोजी केडगाव इंडस्ट्रियल एरियामधील नागछाप हिंग कंपनीच्या मोकळया जागेत अनोळखी पुरूष जखमी अवस्थेत बेशुध्द पडलेला असून त्याचे अंगावर जखमा व मारहाणीचे वळ होते.जखमीस वैदयकीय औषधोपचारकामी सिव्हील हॉस्पीटल, अहिल्यानगर येथे पाठविले असता वैदयकीय अधिकारी जखमीस मयत घोषीत केल्याने कोतवाली पोलीस स्टेशन येथे 88/2025 प्रमाणे अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आला.अकस्मात मृत्यूचे तपासात वैदयकीय अधिकारी यांनी दिलेल्या अभिप्रायावरून अनोळखी इसमास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून कठीण व टणक हत्याराने जबर मारहाण करून जीवे ठार मारून मयताची ओळख पटू नये म्हणुन पुरावे नष्ट केले.

याबाबत कोतवाली पोलीस ठाणे गुरनं 583/2025 बीएनएस कलम 103 (1), 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.या खूनाच्या गुन्ह्याची उकल स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात आली असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गंभीर गुन्हयांची प्राथमिक माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक,अपर पोलीस अधीक्षक यांनी घटना ठिकाणास भेट देऊन, स्थानिक गुन्हे शाखेस अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून, गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार शाहीद शेख, संदीप पवार, फुरकान शेख, विजय ठोंबरे, रविंद्र घुंगासे, मयुर गायकवाड, भगवान थोरात, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे व भगवान धुळे अशांचे पथक नेमुण गुन्हयाच्या तपासाबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.

पथकाने गुन्हयाचे घटनाठिकाणी भेट देऊन, घटनाठिकाणचे जवळील व केडगाव ते कायनेटीक चौक, अहिल्यानगर मार्गावरील 20 ते 25 सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे 1) संदेश संजय क्षेत्रे 2) अमन असीरमिया शेख व 3) मंगेश कालीदत्त कांबळे, सर्व रा.केडगाव, अहिल्यानगर असे आरोपी गुन्हयाचे तपासात निष्पन्न केले.केडगाव, अहिल्या नगर परिसरात आरोपीचा शोध घेऊन 1) संदेश, संजय क्षेत्रे, वय 25, रा.भुषणनगर, केडगाव, अहिल्यानगर 2) अमन असिरमियॉ शेख, वय 23, रा.शिवाजीनगर, केडगाव, अहिल्यानगर व 3) मंगेश कालीदत्त कांबळे, वय 21, रा.भुषणनगर, केडगाव, अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.पंचासमक्ष ताब्यातील आरोपी मंगेश कालीदत्त कांबळे याची अंगझडती घेतली असता

त्याचेकडे मयताचे आधारकार्ड मिळून आले. आधारकार्डवरून मयत हा बोबडा अनारसिंग, रा.सुखपुरी, जैनाबाद, बुरहानपूर, मध्यप्रदेश असल्याचे निष्पन्न झाले.आरोपीस विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता 22 जून रोजी रात्री 2.00 वा.सुमारास आरोपी हे मोपेड गाडीवरून पुणे बस स्टॅण्ड, अहिल्यानगर येथून केडगावकडे जात असताना रस्त्यावर थांबलेल्या अनोळखी इसमास लुटमार करण्याच्या उद्देशाने त्यास मोपेड गाडीवर जबरीने बसवून त्यास केडगाव इंडस्ट्रियल परिसरात नेऊन त्यास मारहाण केली.अनोळखी व्यक्तीकडील बॅग, खिशामधील पैसे व एटीएम कार्ड काढुन घेऊन, मयतास एटीएम पीनची विचारणा करून आरोपी संदेश संजय क्षेत्रे हा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता एटीएमचा पीनकोड चुकीचा असल्याने पैसे निघाले नाहीत.

मयतास लुटण्याच्या उद्देशाने आरोपीतांनी मयतास लाकडी काठी व दगडाने जबर मारहाण करून त्यास जीवे ठार मारले.ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग अमोल भारती यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. —-

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार
Next Article माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?