Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

admin
Last updated: 2025/06/25 at 4:19 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अहिल्यानगर, 25 जून, (हिं.स.) :- पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री संत जनार्दन स्वामी महाराज (पालखी) पायीदिंडीचे भिंगारमध्ये आगमन होताच भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भक्तीमय वातावरणात जय हरी विठ्ठल.. श्री हरी विठ्ठलच्या गजरात स्वागत करण्यात आले. शहरा सह उपनगरात दिंडीचे आगमन झाले असताना वारकरींमुळे वातावरण प्रफुल्लित व भक्तीमय बनले आहे.

भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, सर्वेश सपकाळ, प्रांजली सपकाळ, रमेश वराडे, अभिजीत सपकाळ, संपतराव बेरड यांनी रथातील पादुका डोक्यावर घेऊन परिसरातून मिरवल्या.दिंडीतील वारकऱ्यांनी पुंडलीक वरदा हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकारामचा जयघोष केला.

पालखीतील पादुकांचे पूजन प्रा. माणिक विधाते, अमित खामकर, ईवान सपकाळ, अर्जुनराव बेरड, संपतराव बेरड, विलास तोडमल, सिंधुताई सपकाळ, संगीता सपकाळ, दिपाली सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. दिंडीचे प्रमुख ह.भ.प. आनंदे महाराज मुरारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

आनंदेवाडा श्रीक्षेत्र देवगिरी-दौलताबाद (जि. औरंगाबाद) येथून श्री संत जनार्दन स्वामी महाराज (पालखी) पायी दिंडी आषाढी वारीसाठी निघाली आहे. दिंडीचे भिंगारमध्ये मोठ्या भक्ती भावाने स्वागत करण्यात आले. नगर-करमाळा मार्गे ही दिंडी पंढरपूरला प्रस्थान करणार आहे.प्रा. माणिक विधाते यांनी दरवर्षी राष्ट्रवादी व भिंगारकरांच्या वतीने सपकाळ परिवार दिंडीचे स्वागत करुन सेवा देत आहे. वारकऱ्यांची दरवर्षी केली जाणारी ही सेवा प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. संजय सपकाळ यांनी या दिंडीचे भिंगार शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने स्वागत करण्यात येत असल्याची माहिती दिली. यावेळी दिंडीतील वारकऱ्यां ना सपकाळ परिवाराच्या वतीने अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी
Next Article इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?