Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

admin
Last updated: 2025/06/26 at 3:19 PM
admin
Share
5 Min Read
SHARE

दिनांक 26 जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. अमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा हे ध्येय घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा प्रशासन, पोलीस दल आणि संबंधित सर्व यंत्रणा यांनी यासाठी कंबर कसली आहे. या अनुषंगाने अमली पदार्थांचे शरीरावरील दुष्परिणाम व कायदे यांचा आढावा घेणारा लेख …

पार्श्वभूमी

26 जून हा दिवस जगभर “जागतिक अंमली पदार्थ दिन” म्हणून विविध उपक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांनी 1988 साली याची घोषणा केली. 26 जून 1978 या दिवशी चीनमधील पहिल्या अफू युध्दाच्या काळात अफू व्यापारावर घातलेल्या बंदीचा संदर्भ या दिवसाला आहे.

अमली पदार्थ व्याख्या –

ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते. त्यांना रुढार्थाने मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणतात.

अमली पदार्थ प्रकार

अंमली पदार्थामध्ये गांजा, अफु, चरस, कोकेन, ब्राऊन शुगर, मेफेड्रोन, नशेच्या गोळ्या व इंजेक्शन हे व यासारखे मनोव्यापारावर परिणाम करणारे हे पदार्थ येतात. अफू व त्यापासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन इ. पदार्थ, भांग, चरस (हशिश) वगैरे पदार्थांचा मादक पदार्थात समावेश केला जातो. ब्राऊन शुगर, झंडु बाम रुमालावर टाकून त्याचा नाकाद्वारे वास घेतात. यातूनही नशा येते. स्पिरीटचाही नशेसाठी अशाच प्रकारे वापर केला जात आहे. यापुढेही जाऊन श्रीमंत लोक सिंथेटीक अमली पदार्थ आणि आता घातक जीवघेणा एमडीचा (मेफेड्रॉन) वापर होऊ लागला आहे. शिवाय मॅजिक मश्रूम, एलसीडी, मारिजुआना, म्याव-म्याव, डॅरनेक्स, शिलावती, वेदनाशामक गोळ्या, व्हाईटनर ते औषधे याचाही वापर नशेसाठी केला जाऊ लागला आहे.

शरीरावरील दुष्परिणाम

तज्ज्ञांच्या मते अंमली पदार्थ सेवन करणे हा एक मानसिक आजार आहे. अमली पदार्थ सेवन केल्यास प्रत्येक व्यक्तिचा मेंदू आणि शरीर वेगाने प्रतिक्रिया देतात. शरीराला अंमलाखाली राहण्याची सवय झाल्यास त्याचा परिणाम इतर वेळीही दिसून येतो. अशा व्यक्तीला एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला कठीण जाते, एकाग्रता राहत नाही. नैराश्य येऊन मानसिक आरोग्याच्या समस्याही यातून निर्माण होतात. एखादी व्यक्ती अंमलाखाली असताना तिचा स्वतःच्या विचारांवर, कृतींवर ताबा नसतो. ती व्यक्ती हिंसक होण्याची शक्यता असते. यातूनच त्यांच्या आणि त्यांच्याभोवती असणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

गोळी, इंजेक्शन वा नाकावाटे ओढून घेतलेल्या मादक पदार्थांमुळे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. म्हणजे या ड्रग्सचा अंमल असताना योग्य-अयोग्याचं भान राहत नाही. नीट – सुसंगत विचार करता येत नाही, आपल्या क्रिया मंदावतात, धूसर दिसते, Hallucinations म्हणजे प्रत्यक्षात नसणाऱ्या गोष्टींचे आभास होतात, आवाज येतात. त्याचा नकारात्मक परिणाम जीवनावर होतो. त्यातून कित्येक तरूण हे आत्महत्या करणे त्याचबरोबर गुन्हेगारी जगताकडे वळत आहेत.

अमली पदार्थांच्या सेवनाचे शरीरावर दीर्घकालीन परिणामही होतात. यकृतावर परिणाम होतो. फॅटी लिव्हर, अल्कोहोलिक हेपेटायटिस, लिव्हर सिऱ्होसिसचा धोका निर्माण होतो. याशिवाय अल्सर, हृदयविकार, कर्करोग, उच्च रक्तदाब यांचाही धोका उद्भवतो.

अमली पदार्थ विरोधी समित्या

सांगली जिल्ह्यामध्ये पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक उपाययोजना समिती व जिल्हा दंडाधिकारी, सांगली यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती, सांगली (एनकॉर्ड) या दोन समित्या कार्यरत आहेत.

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती, सांगली (एनकॉर्ड) ही समिती सन 2022 रोजी केंद्र शासनाच्या आदेशाने स्थापन करण्यात आली आहे. त्याच्या चालू वर्षात चार बैठका झालेल्या आहेत. तसेच अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक उपाययोजना समितीच्या चालू वर्षात नऊ बैठका झालेल्या आहेत.

या दोन्ही समित्यांच्या बैठकांमध्ये दिलेल्या सूचनांनुसार वेळोवेळी कार्यवाही करण्यात आली आहे. प्रतिबंध, प्रचार-प्रसिद्धी (जनजागृती) व पुनर्वसन अशा तीन टप्प्यांवर अमली पदार्थविरोधी कार्यवाही जिल्ह्यात सुरू आहे.

अमली पदार्थ तस्करांना प्रतिबंधात्मक कारवाई करताना अंमली पदार्थ विरोधी कायदा सन 1985 नुसार अंमली पदार्थाची लागवड, वाहतूक, विक्री, साठवणूक व सेवन याबाबत सांगली जिल्हा पोलीस दलाने चालू वर्षात अंमली पदार्थ विरोधी 106 गुन्हे दाखल करून कारवाया केलेल्या आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 137 लोकांना अटक करण्यात आली आहे. सदरच्या कारवायांमध्ये गांजा, मेफेड्रोन हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले असून त्यांची किंमत 30 कोटी पेक्षा जास्त आहे. एम.आय.डी.सी. तसेच जिल्हा उद्योग केंद्र, सांगली यांच्याकडील जिल्ह्यातील बंद पडलेले कारखाने अंमली पदार्थांच्या अनुषंगाने तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील डार्क स्पॉटस्‌ यांची माहिती काढुन स्थानिक प्रशासनामार्फत तेथे दिवाबत्तीची तसेच सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात येत आहेत. औषध प्रशासनामार्फत सर्व मेडिकल दुकानांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

प्रचार प्रसिद्धी म्हणजेच जनजागृती अंतर्गत शालेय स्तरावर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच, चालू शैक्षणिक वर्षापासून अमली पदार्थ विरोधात प्रार्थनेवेळी प्रतिज्ञा व परिपाठ देण्यात येणार आहे. शाळा परिसर तंबाखूमुक्त करण्यात आला आहे.

(संप्रदा बीडकर,

जिल्हा माहिती अधिकारी, सांगली)

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील – राजनाथ सिंह
Next Article मेक्सिको : धार्मिक उत्सवादरम्यान गोळीबार,१२ जणांचा मृत्यू तर २० जखमी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?