नवी दिल्ली, 26 जून (हिं.स.)
भारतीय
हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात पोहोचताच व्हिडिओ कॉल केला
आहे. त्यांनी भारतीयांना नमस्कार करत आपला अनुभव या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून
सांगितला आहे. शुभांशू गुरुवारी सकाळी अमेरिका, पोलंड
आणि हंगेरीच्या इतर तीन अंतराळवीरांसह अवकाशात पोहोचले आहेत.
शुभांशू
शुक्ला आपल्या व्हिडिओ कॉलमध्ये म्हणाले, “नमस्कार. मला आता शून्य गुरुत्वाकर्षणाची सवय होत आहे. एखाद्या
मुलाप्रमाणे मी चालायला शिकत आहे किंवा कसे चालायचे हे शिकत आहे. मी खरोखरच या
क्षणाचा आनंद घेत आहे. तिरंगा मला नेहमीच आठवण करून देतो की, तुम्ही सर्वजण
माझ्यासोबत आहात. भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमासह आगामी गगनयान
मोहिमेसाठी हे एक मजबूत पाऊल आहे.”
लखनऊमध्ये
जन्मलेले ३९ वर्षीय शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर ठरले आहेत.
४१ वर्षांपूर्वी, भारताचे राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या
सल्युट-७ अंतराळ स्थानकाच्या कक्षेत आठ दिवस घालवले होते.