मुंबई, 28 जून (हिं.स.)।
रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबई ते रेवादरम्यान धावणाऱ्या २६ विशेष गाड्यांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई ते रेवा दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांची वेळ खालीलप्रमाणे वाढवली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – रेवा विशेष
गाडी क्रमांक 02188, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – रीवा विशेष, प्रत्येक शुक्रवारी चालणारी गाडी आता ०४.०७.२०२५ ते २६.०९.२०२५ या कालावधीत चालवण्यात येणार (१३ सेवा).
गाडी क्रमांक 02187, रीवा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष, प्रत्येक गुरुवारी चालणारी गाडी आता ०३.०७.२०२५ ते २५.०९.२०२५ या कालावधीत चालवण्यात येणार (१३ सेवा).
धावण्याच्या दिवसांमध्ये, वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही.
आरक्षण : विशेष ट्रेन क्रमांक 02188 च्या विस्तारित फेऱ्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू झाली.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
प्रवाशांना विशेष ट्रेन सेवांचा लाभ घेण्याची विनंती आहे.