Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सीमेजवळ घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी गाईडला भारतीय लष्कराने घेतले ताब्यात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

सीमेजवळ घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी गाईडला भारतीय लष्कराने घेतले ताब्यात

admin
Last updated: 2025/06/30 at 5:06 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

श्रीनगर , 30 जून (हिं.स.)। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानकडून सातत्याने भारतात घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत आणि प्रत्येकवेळी भारतीय सैन्य हे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडत आहे. दरम्यान, रविवारी (२९) जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथील नियंत्रण रेषेवर (एलओसी) दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सैन्याने हा प्रयत्न उधळून लावला.या दरम्यान एका पाकिस्तानी गाईडला अटक करण्यात आल्याचे लष्कराने सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसखोरी करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारे भारतीय सैन्याने बीएसएफच्या सहकार्याने सापळा रचला. घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या ४-५ सशस्त्र दहशतवाद्यांच्या हालचाली सैनिकांनी पाहिल्या. या संयुक्त कारवाईदरम्यान, एका व्यक्तीला अटक करण्यात आली. हा व्यक्ती पाकिस्तानी गाईड असून, तो घुसखोरीला मदत करत होता. या कारवाईत, पळून जाण्याचा प्रयत्न करताना जैशचे चार दहशतवादी जखमी झाले आहेत.

गाईडला अटक केल्यानंतर सैन्याने परिसरात शोध मोहीम राबवली. या दरम्यान मोबाईल फोन आणि पाकिस्तानी चलनासह अनेक संवेदनशील वस्तू जप्त करण्यात आल्या. अधिकाऱ्याने सांगितले की, सुरुवातीच्या चौकशीत अटक केलेल्या व्यक्तीने सांगितले की, तो नियंत्रण रेषेजवळील पीओकेचा रहिवासी असून, पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार काम करतो. या गाईडने पुष्टी केली की, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारुगोळ्यासह इतर आक्षेपार्ह साहित्य घेऊन भारतात येत होते.

—————

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कैलास मानसरोवर यात्रेला आजपासून सुरुवात
Next Article तेलंगणा : केमिकल फॅक्ट्रीत स्फोट, १० जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?