Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: येत्या ५ तारखेला मोर्चाऐवजी विजयी मेळावा होणार – राज ठाकरे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

येत्या ५ तारखेला मोर्चाऐवजी विजयी मेळावा होणार – राज ठाकरे

admin
Last updated: 2025/06/30 at 5:11 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 30 जून (हिं.स.) – इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला. हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे आणि त्याबद्दल तमाम मराठी जनांचं मनापासून अभिनंदन. त्यामुळे येत्या ५ तारखेला मोर्चा निघणार नाही, तर त्याऐवजी विजयी मेळावा होईल. या मेळाव्यात कोणताही झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मेळावा असेल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले. बाकी 5 तारखेच्या विजयी मेळाव्याचे तपशील लवकरच कळवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. हिंदी सक्ती विरोधातील अध्यादेश मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.

ठाकरे पुढे म्हणाले, हा विषय काही श्रेयवादाचा नाही. मात्र हा विषय समोर आल्यानंतर आम्ही त्याला विरोध केला. मागच्यावेळी पाठवलेली तिन्ही पत्रे मी वाचून दाखवली होती. आम्हाला उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी पाठिंबा दिला. 5 तारखेला आम्ही मोर्चाचे आयोजन केले होते. हा मोर्चा निघाला असता तर न भुतो न भविष्य निघाला असता. संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता. सरकारला मराठी माणसाची ताकद कळाली असती.

काल मला संजय राऊत यांचा फोन आला होता. ते म्हणाले काय करायचं पुढे. म्हटलं मोर्चा तर रद्द करावा लागेल. ते म्हणाले विजयी मेळावा घ्यायचा का? ५ तारखेला घेऊ का म्हणाले. म्हटलं घ्या. पण ठिकाणं ठरवू नका. सहकाऱ्यांशी बोलून मेळावा घेऊ. तेही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी बोलतील. मेळावा झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावू नका. तुम्हीही लावू नका. वर्तमानपत्रे आणि चॅनलने हा विषय लावून धरला. अशा बाबत सर्व जागरूक असले पाहिजे. कुठे कुठे काय काय घडतंय हे तुम्ही सांगितलं पाहिजे. ५ तारखेच्या मेळाव्याचा निर्णय कुठे होईल हे लवकरच सांगू.

यावेळी राज ठाकरेंना ठाकरे बंधू एकत्र येऊ नये, म्हणून हा निर्णय रद्द करण्यात आला का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ठाकरे म्हणाले, तुम्ही मोर्चाला पक्षीय लेबल लावू नका. विजयी मेळावा झाला तरी लेबल लावू नका. युती आघाडी, निवडणुका येत जातील, पण मराठी भाषा संपली की परत येणार नाही. भाषा ही संस्कृती टिकवते. तीच मुळाशी गेली तर युती आघाड्यांना काय अर्थ आहे. युती आघाडीचा विचार आता करून चालणार नाही. या गोष्टीकडे संकट म्हणून पाहावं, त्याला राजकीय लेबल लावू नये. उद्या मेळावा वगैरे काय घ्यायचा असेल तर मी तुम्हाला कळवेन. कोणताही अजेंडा नसेल. आधीच सांगितलं. मग नरेटिव्ह त्यांनी सेट केला की आम्ही. अजित पवार यांनीही विरोध केला. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे ना, असेही ते म्हणाले.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अझहर महमूद पाकिस्तान क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक
Next Article इंडोनेशिया : बतिक एअर कंपनीच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?