Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: इंडोनेशिया : बतिक एअर कंपनीच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

इंडोनेशिया : बतिक एअर कंपनीच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला

admin
Last updated: 2025/06/30 at 5:14 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

जकार्ता, 30 जून (हिं.स.)।इंडोनेशियातील टांगेरंग शहरातील विमानतळावर एक मोठा विमान अपघात थोडक्यात टळला.बतिक एअर कंपनीचे बोईंग ७३७ विमान अपघातग्रस्त होता होता राहिले. इंडोनेशियातील टांगेरंग शहरातील सोएकार्नो-हट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. विमान धावपट्टीवर उतरत असतानाचा वादळी पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे विमान डगमगले आणि घासले गेले.या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बतिक एअर कंपनीच्या बोईंग ७३७ या विमानाला शनिवारी (२८ जून) खराब हवामानाचा फटका बसला. इंडोनेशियातील सोएकार्नो-हट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना दुर्दैवी घटना घडता घडता टळली.या घटनेनंतर बतिक एअर कंपनीचे अभियांत्रिकी पथक विमानतळावर दाखल झाले. या विमानाची पूर्णपणे पाहणी करण्यात आली. त्यात विमानाचे मोठे नुकसान झाले नसल्याचे दिसून आले.

बतिक एअर कंपनीचे प्रवक्ते दणांग मंडाला प्रीहांतोरो यांनी सांगितले की, बोईंग ७३७ विमान (क्रमांक पीके-एलडीजे) वादळी हवामान असताना उतरत होते. मात्र वेगाने वारे वाहत असल्याने त्या दाबामुळे विमान एका बाजूला ढकलले गेले. विमानाचे एक पंख धावपट्टीला लागले होते. त्यामुळे विमानात प्रचंड गोंधळ उडाला, पण वैमानिकांनी कठीण प्रसंगात धीर ढळू न देता सुरक्षितपणे उतरवले.

या विमानाचा लँडिंगचा व्हिडीओ समोर आला आहे. पाऊस सुरू असून, दृश्यमानता कमी झालेली असल्याचे दिसत आहे. विमानाचे मागील चाके धावपट्टीला स्पर्श करतात तेव्हा ते हेलकावा खाते. त्यानंतर ते एका बाजूने झुकत जाते. विमान इतके झुकते की त्याचे इंजिन जमिनीला लागण्याची शक्यता होती. पण, पायलटने प्रसंगावधान राखल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article येत्या ५ तारखेला मोर्चाऐवजी विजयी मेळावा होणार – राज ठाकरे
Next Article मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?