शिमला, 1 जुलै (हिं.स.)
हिमाचलमध्ये
ढगफुटीमुळे मंडी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारसोगमध्ये तीन
जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता आहेत. कितारपूर-मनाली चौपदरी मार्ग
बंद आहे, ज्यामुळे
वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याने पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा
दिला आहे. लार्जी आणि पांडोह धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. आणि जलविद्युत
प्रकल्प बंद करण्यात आले आहेत.
मुसळधार
पाऊस आणि भूस्खलनामुळे कितारपूर-मनाली चारपदरी मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे, ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे
शेकडो लोक बोगद्यांमध्ये आणि रस्त्यावर विविध ठिकाणी अडकली आहेत. प्रशासनाकडून
त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून
प्रशासनाने मंडी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये एक दिवसाची सुट्टी जाहीर
केली आहे.
हिमाचल
प्रदेशात ढगफुटीची ही पहिलीच घटना नाही. २६ जून रोजी कांगडा आणि कुल्लू जिल्ह्यात
ढगफुटीमुळे अचानक पाण्याचा पूर आला. पुरामुळे १० जण बेपत्ता झाले. एक दिवसापूर्वी
झालेल्या मुसळधार पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला. सुमारे २० जण पुरात वाहून
गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती, त्यापैकी काहींना वाचवण्यात आले. कांगडा
जिल्ह्यातील मानुनी खाड येथील इंदिरा प्रियदर्शिनी जलविद्युत प्रकल्पाच्या
जागेजवळील कामगार वसाहतीत राहणारे सुमारे १५-२० कामगार खनियारा मानुनी खाड येथे
पाण्याची पातळी वाढल्याने वाहून गेल्याची माहिती समोर आली होती.