मुंबई : आपण मुंबईत येणार असून आपल्याला रोखण्याचा कोणाच्या बापामध्ये हिंमत आहे, असं म्हणणाऱ्या कंगाना रणौतला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिलं आहे.
ट्विटवरुन कंगनावर निशाणा साधत रुपाली यांनी कंगनाला दिसणारी मुंबई ही मुंबई पोलिसांमुळे सुरक्षित आहे असं म्हटलं आहे. तसेच मुंबई कोणाच्या बापाची आहे हे आम्ही दाखवलं असतं मात्र कंगनासारख्या कृतघ्न लोकांसाठी आमच्याकडे वेळ नाही, असा टोलाही रुपाली यांनी लगावला आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. यानंतर सोशल मीडियावर सामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत अनेकांनी कंगनावर टीका केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोशल मीडियावर कंगना विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान कंगनाने अजून एक ट्विट केलं असून मुंबईत येऊ नकोस असं धमकावणाऱ्यांना थेट आव्हान दिलं आहे.
कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं होतं. मुंबईची भीती वाटत असेल तर कंगनाने परत येऊ नये अशी टीका राऊत यांनी केली होती. या वक्तव्यावरुन राऊत यांच्यावर टीका करताना कंगानाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती.