नवी दिल्ली, 7 जुलै (हिं.स.)
२६/११
च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याने मोठा खुलासा केला आहे.
तहव्वुरने म्हटले आहे की, तो पाकिस्तानी सैन्याचा सर्वात विश्वासू एजंट होता.
त्याने मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचेही कबूल केले आहे.
तहव्वुर सध्या एनआयएच्या ताब्यात आहे आणि दिल्लीमधील तिहार तुरुंगात आहे. मुंबई
पोलिसांची गुन्हे शाखा त्याची चौकशी करत आहे.
मुंबई
पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीदरम्यान तहव्वुरने २००८ च्या मुंबई
हल्ल्यांबद्दल, पाकिस्तान आणि आयएसआयबद्दल अनेक मोठे
खुलासे केले. तहव्वुरने दावा केला की, तो पाकिस्तानी सैन्याचा सर्वात विश्वासू
एजंट होता आणि आखाती युद्धादरम्यान सौदी अरेबियात तैनात होता. तहव्वुरने असेही
सांगितले की, त्याने पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबा प्रशिक्षण केंद्राला अनेक वेळा
भेट दिली होती. त्याने येथे प्रशिक्षण घेतले होते.
चौकशीदरम्यान
तहव्वुरने सांगितले की, मुंबईतील दहशतवादी हल्ला पूर्ण
नियोजनाने करण्यात आला होता. हल्ल्यापूर्वी तो अनेक ठिकाणी फिरला होता. यामध्ये
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा समावेश आहे. राणा म्हणतो की, २६/११ चा हल्ला पाकिस्तानच्या आयएसआयच्या
देखरेखीखाली झाला. पाकिस्तानी लष्कराने त्याला अनेक ठिकाणी पाठवले होते. तो भारतात
तसेच सौदी अरेबियातही राहिला आहे.
मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आता राणाला अटक करून रिमांडवर घेण्याच्या
तयारी करत आहे. राणा सध्या एनआयएच्या न्यायालयीन कोठडीत आहे. दिल्ली न्यायालयाने त्याची एनआयए कोठडी ९
जुलैपर्यंत वाढवली आहे. दरम्यान, तहव्वुर राणाला ऑक्टोबर २००९ मध्ये अमेरिकेतील
शिकागो येथे अमेरिकन एजन्सी एफबीआयने अटक केली होती. १० एप्रिल रोजी राणाला
अमेरिकेतून एका खास विमानाने भारतात आणण्यात आले होते.