\डोेबिंवली, 9 जुलै, (हिं.स.)। देश प्रथम त्यानंतर पक्ष शेवटी स्वतः ही विचारधारा जगणारे, राष्ट्रहितासाठी आयुष्य वाहणारे स्व. रामभाऊ म्हाळगी यांचं कार्य आजही मार्गदर्शक आहे. ते एक आदर्श लोकप्रतिनिधी, अभ्यासू संसदपटू, अत्यंत कुशल संघटक आणि सजग विचारवंत होते. सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी सुरू केलेल्या चळवळी, वंचित घटकांसाठी केलेली उत्तुंग कामगिरी आणि राजकारणातील नैतिकतेचा आग्रह हे आजही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले आहे. प्रेरणास्थानी असलेल्या स्व. रामभाऊ म्हाळगी यांना रविंद्र चव्हाण यांनी जयंती निमित्त अभिवादन केले.
ते पुढे म्हणाले, ठाणे जिल्ह्याचे खासदार म्हणून त्यांनी कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचा आवाज देशाच्या संसदेत बुलंद केला. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांच्या जीवनात त्यांना आजही मोलाचे स्थान आहे.
