Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस

admin
Last updated: 2025/07/10 at 4:02 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 10 जुलै (हिं.स.) – राज्य मंत्रिमंडळातील शिवसेना गटाचे नेते, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपाहारगृह, जमीन खरेदी प्रकरणी विरोधकांकडून आरोप करण्यात आले होते. दरम्यान आता त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे.

याविषयी मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, आयकर विभाग असेल किंवा इतर विभाग असतील हे त्यांचे काम करत आहे. त्यात काही गैर नाही. वर्ष २०१९ आणि २०२४ मध्ये संपत्तीमध्ये झालेली वाढ यावर स्पष्टीकरण मागितले आहे, ते त्यांचे काम करत आहेत. काही लोकांना वाटते की, राजकीय पुढार्‍यांना काही कारवाई होत नाही, असे काही नाही. आयकर विभागाने मला नोटीस दिली असून मी त्याला उत्तर देणार आहे. काही लोकांनी माझ्या विरोधात आयकर विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची नोंद विभागाने घेत मला नोटीस पाठवली आहे. आयोगाने उत्तर देण्यासाठी ९ जुलैपर्यंतची मुदत दिली होती; पण आम्ही वेळ वाढवून मागितला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

संजय शिरसाट यांच्यावर झालेल्या विट्स हॉटेल आरोप प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधानसभेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. मात्र कुठलीही शंका मनात नको, स्वतः संजय शिरसाट यांनी खुलासा केला आहे. टेंडरमध्ये चुकीचं असेल तर ते तपासू असे मुख्यमंत्री म्हणाले. तर आमच्या मंत्र्यांची जाणूनबुजून चौकशी लावलेली नाही असं दावा उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे यावरून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी उदय सामंत यांच्यावर टीका करत मुख्यमंत्री मोठे आहेत की उदय सामंत मोठे आहेत असा सवाल उपस्थित केला आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सहा महिन्यांत पश्चिम विदर्भात ५२७ शेतक-यांची आत्महत्या
Next Article मुंबईतील ३११ बेकर्‍या हरित इंधनात रूपांतरित करण्याकरिता हायकोर्टाची मुदतवाढ

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?