Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी

admin
Last updated: 2025/07/14 at 3:13 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

सुप्रीम कोर्ट म्हणाले ठाकरे गटाने वारंवार अर्ज करू नये

नवी दिल्ली, 14 जुलै (हिं.स.) – शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. कारण या प्रकरणाला 2 वर्षे झाली आहेत. खूप कालावधी झाला आहे. ऑगस्ट महिन्यात अंतिम सुनावणीला सुरुवात करू, असे सांगत न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे. तसेच हे प्रकरण पुढील 3 महिन्यांत निकाली काढण्याचे स्पष्ट संकेत दिले. दरम्यान याची तारीख कोणती असेल, ते आम्ही रोस्टर पाहून सांगू, असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्हावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात सुरु असलेला वाद निर्णायक वळणावर येऊन ठेपला होता. याबाबत आता तरी ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा दोन्ही पक्षांसह साऱ्या महाराष्ट्राला होती. मात्र न्यायालयात आज, सोमवारी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी शिंदे गटाकडून मुकूल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी यु्क्तिवाद केला. तर ठाकरे गटाकडून रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यांनी ठाकरे गटाला सांगितले की, आता या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत. तुम्ही त्यामुळे आता नव्याने अर्ज करणे बंद करा. हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. आता या प्रकरणाची मुख्य सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेऊ. न्या. सूर्यकांत यांनी याप्रकरणाची मुख्य सुनावणी सुरु करण्याचे सांगितल्यानंतर कपिल सिब्बल यांनी ऑगस्ट महिन्यातील तारखेची मागणी केली. तेव्हा न्यायमूर्तींनी वेळापत्रक तपासून तुम्हाला सुनावणीची तारीख कळवतो, असे सांगितले.

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी ऑगस्टमध्ये होऊन निकाल यावा, हा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल. शिंदे गटाचे म्हणणं होतं की, दोन वर्षे समोरील बाजूच्या पक्षाने काहीच का केले नाही. त्यावर न्यायालय म्हणाले की, जे काय सगळं असेल दोन वर्ष झालेले आहेत आणि आता आम्हाला याचा सोक्षमोक्ष करावा लागेल कधी ना कधी. ऑगस्टची तारीख आम्ही तुम्हाला दोन ते तीन दिवसात देऊ आणि अशी तारीख देऊन ज्या तारखेला हे मॅटर ऐकलं जाईल. आता मॅटर ऐकलं गेल्यावर एक ते दोन दिवस याच्यावर युक्तिवाद होतील त्याच्यानंतर निकाल राखून ठेवला जाईल, अशी शक्यता आहे.

ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्याय‍धीशांनी मुख्य याचिकेवरच आपण सुनावणी घेऊया, असं सांगत ऑगस्टमध्ये सुनावणी करू असं सांगितले. पुढील २-३ दिवसांत ऑगस्टमधील सुनावणीची तारीख देऊ असंही सांगितले. जर ऑगस्टमध्ये या प्रकरणाची सुनावणी झाली तर सप्टेंबर-ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत या प्रकरणावर निकाल येऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याआधी झाल्या तर जैसे थे परिस्थिती असेल असं त्यांनी सांगितले.

सुनावणीनंतर वकिल असिम सरोदे यांनी सांगितले की, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होईल. हस्तक्षेप याचिकेचा उद्देश सफल झालेला आहे. लवकरात लवकर सुनावणी घेतली गेली पाहिजे यासाठी हस्तक्षेप याचिका असते. त्याची कारण दिलेली असतात. त्याचा उपयोग प्रभावीपणे झालेला आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला आमदार अपात्रतेचा निर्णय आणि चिन्ह या संदर्भातील दोन सुनावण्या ऐकून घेऊन न्यायालय निर्णय देईल. या दोन्ही याचिकांवर आम्ही सुनावणी घेऊ, असे न्यायालयाने सांगितले आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश
Next Article रशियाने युद्ध थांबवावे, अन्यथा मोठा टॅरिफ आकाराला जाईल- ट्रम्प

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?