लंडन, 15 जुलै (हिं.स.) : इंग्लंडने
लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारताचा २२ धावांनी पराभव केला. लॉर्ड्स कसोटीच्या
शेवटच्या दिवशी यजमान संघाने भारतीय संघाला १७० धावांत गुंडाळले आणि सामना जिंकला.
या विजयासह इंग्लंडने भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-२ अशी
आघाडी घेतली. परदेशी भूमीवर भारतीय संघाचा हा दुसरा सर्वात कमी धावांनी झालेला
पराभव आहे. यापूर्वी,१९७७ मध्ये ब्रिस्बेनमध्ये
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया. १६ धावांनी पराभव झाला होता.
पाच
कसोटी सामन्यांच्या मालिकेत बेन स्टोक्सच्या संघाने पहिल्या लीड्स कसोटीत भारताचा
पाच विकेट्सने पराभव केला होता. तर भारतीय संघाने दुसरी कसोटी विक्रमी धावांनी
जिंकली होती. आणि कसोटी मालिकेत १-१ ने बरोबरी साधली होती. या मालिकेत भारताला
आपली आघाडी वाढवण्याची संधी होती.मात्र, फलंदाजांच्या हाराकिरीमुळे टीम इंडियाला
लॉर्ड्समध्ये रंगतदार लढतीत पराभव सहन करावा लागला.
पाचव्या
दिवसाचा खेळ ५८/४ च्या धावसंख्येवरुन पुढे सुरू झाला. पहिल्या सत्रात संघाने तीन
विकेट गमावल्या. उपाहारापूर्वी भारताने ऋषभ पंत आणि केएल राहुल यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर वॉशिंग्टन
सुंदरला खाते उघडता आले नाही. नितीश १३
धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसऱ्या कसोटीचा निकाल तिसऱ्या सत्रात लागला.
एकेकाळी असे वाटत होते की, या सामन्याचा निकाल दुसऱ्या सत्राच्या अखेरीस येईल. पण
तसे झाले नाही. दुसऱ्या सत्राची सुरुवात रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांच्या
भागीदारीने झाली. त्यावेळी जडेजा १७ धावांसह क्रीजवर उपस्थित होता आणि भारताला
विजयासाठी ८१ धावांची आवश्यकता होती. सुमारे १:३० तास क्रीजवर राहिल्यानंतर बुमराह
बाद झाला. त्याला बेन स्टोक्सने त्याला बाद केले. नवव्या विकेटसाठी बुमराहने
जडेजासोबत १३२ चेंडूत ३५ धावा जोडल्या. बुमराहनंतर, जडेजाने सिराजची साथ दिली. दोघांनीही शेवटच्या
विकेटसाठी ८० चेंडूत २३ धावा जोडल्या. सिराजची विकेट पडताच भारताच्या विजयाच्या
आशा संपुष्टात आल्या. ७५ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर इंग्लंडचा फिरकी गोलंदाज
शोएब बशीरने ऑफ-ब्रेक टाकला, जो सिराजने बचावला. पण खेळपट्टीवर पडल्यानंतर चेंडू परत फिरकीला
लागला आणि स्टंपवर आदळला. अशाप्रकारे बाद झाल्यानंतर, सिराज भावुक झाला. तो चार धावा करू शकला तर जडेजा १८१ चेंडूत ६१
धावा काढून नाबाद राहिला.