मुंबई, 15 जुलै (हिं.स.) :
बॉम्बे
स्टॉक एक्सचेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात
व्यक्तीने बीएसईला धमकीचा ईमेल पाठवला आणि तो उडवून देण्याची धमकी दिली. धमकीचा
ईमेल मिळाल्यानंतर जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्यात आला. बॉम्ब स्क्वॉड टीम
आणि स्थानिक पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पण तपासानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये
काहीही संशयास्पद आढळले नाही.
बॉम्बे
स्टॉक एक्सचेंजला धमकी देणारा ईमेल कॉम्रेड पिनारायी विजयन नावाच्या ईमेल आयडीवरून
आला होता. या ईमेलमध्ये लिहिले होते की, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या टॉवर
बिल्डिंगमध्ये ४ आरडीएक्स आयईडी बॉम्ब ठेवण्यात आले आहेत आणि दुपारी ३ वाजता स्फोट होतील.
एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम
३५१(१)(ब), ३५३(२), ३५१(३), ३५१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. पोलिसांनी आता पुढील तपास सुरू केला आहे.
