Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी १ ऑगस्टपासून मुंबईत धावणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी १ ऑगस्टपासून मुंबईत धावणार

admin
Last updated: 2025/07/15 at 2:47 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 15 जुलै (हिं.स.) : देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावण्यासाठी सज्ज झाली असून गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी बंदर दरम्यान येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून ही वाहतूक सेवा सुरू होणार आहे. यामुळे मुंबईतून नवी मुंबई विमानतळावर पोहचण्यासाठी कमी वेळ लागणार आहे. ई-वॉटर टॅक्सी पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी सज्ज आहे. सप्टेंबरमध्ये नवी मुंबई विमानतळ सुरू होणार आहे, त्याआधी वॉटर टॅक्सी सुरू करण्याचं नियोजन सरकारकडून करण्यात आले आहे. त्यानुसार, दोन आठवड्यात ई-वॉटर टॅक्सी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.

ही ई-वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए आणि डोमॅस्टिक क्रूझ टर्मिनस ते जेएनपीए या दोन जलमार्गावर नियमितपणे धावणार असल्याचे समजतेय. ई वॉटर टॅक्सीची सेवा फक्त एका मार्गासाठी मर्यादित न राहता टप्प्याटप्प्याने बेलापूर, घारापुरी आणि मांडवापर्यंत विस्तारित करण्यात येणार असल्याची माहितीही मिळाली आहे. या इ- वॉटर टॅक्सीची लांबी १३.२७ मीटर असणार आहे. याची रुंदी : ३.०५ मीटर असणार आहे.या टॅक्सीत २४ प्रवासी एकावेळी बसू शकतील इतकी प्रवासी क्षमता असणार आहे. टॅक्ससीचा वेग हा १४ नॉटिकल माइल्स इतका असणार आहे

तर या टॅक्सीची बॅटरी क्षमता : ६४ किलोवॅट असणार असून ही चार तासापर्यंत चालू शकते.या ई-वॉटर टॅक्सीमुळे इंधन खर्चात मोठी बचत होईल, त्यामुळे प्रवाशांना परवडणाऱ्या दरात याची सेवा मिळेल. शिवाय, शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासही यामुळे मदत होईल. मुंबई आणि नवी मुंबई यादरम्यान वॉटर टॅक्सी सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना प्रवासासाठी आणखी एक वेगळा मार्ग मिळणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. परवडणाऱ्या दरामध्ये वॉटर टॅक्सीमधून प्रवास करता येणार असल्याचे समजतेय. मुंबईमध्ये धावणारी ही ई-वॉटर टॅक्सी विदेशातून आयात न करता माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) यांनी पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली आहे. —————

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘युग प्रवर्तक’ डॉ. हेडगेवार नाट्याला प्रचंड प्रतिसाद
Next Article परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी घेतली चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?