Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पहलगाम हल्ला : आयएसआय व लश्कर-ए-तोयबाचा कट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पहलगाम हल्ला : आयएसआय व लश्कर-ए-तोयबाचा कट

admin
Last updated: 2025/07/15 at 2:59 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

तपासात सॅटेलाईट फोनवरून षडयंत्राचा झाला भंडाफोड

श्रीनगर, 15 जुलै (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन येथे 22 एप्रिल 2025 रोजी 26 निष्पाप हिंदूंचे टार्गेट किलींग करण्यात आले होते. हा हल्ला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि लश्कर-ए-तैयबा यांच्या संयुक्त नियोजनातून घडवल्याची माहिती पुढे आली आहे. सॅटेलाईट फोन आणि लोकेशन डिकोडींगवरून सुरक्षा यंत्रणांना या हल्ल्यातील पाकिस्तानी सहभागाचा छ़डा लावल्याची माहिती पुढे आलीय.

सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्याचा संपूर्ण कट पाकिस्तानी सैन्य व राजकीय नेतृत्वाच्या निर्देशांवरून रचण्यात आला होता. विशेष म्हणजे, हल्ल्यात केवळ पाकिस्तानी परदेशी दहशतवाद्यांचा सहभाग होता. कोणत्याही स्थानिक काश्मिरी दहशतवाद्यांना या कटात सहभागी करण्यात आले नव्हते, जेणेकरून हल्ल्याचे मूळ पाकिस्तानकडे वळू नये. या हल्ल्यामागे मुख्य सूत्रधार सुलेमान असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो पाकिस्तानच्या स्पेशल फोर्सेसमधील माजी कमांडो असल्याचा संशय आहे. त्याने 2022 मध्ये नियंत्रण रेषा (एलओसी) पार करून जम्मू क्षेत्रात एम-4 रायफलसह प्रवेश केला होता. त्यापूर्वी त्याने पंजाब प्रांतातील मुरीदके येथील लश्कर-ए-तैयबाच्या तळावर प्रशिक्षण घेतले होते. सुलेमानसोबत आणखी दोन पाकिस्तानी दहशतवादी होते, मात्र त्यांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

सुलेमानचे लोकेशन 15 एप्रिल रोजी त्राल जंगलात असल्याचे सॅटेलाईट फोन विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे. यावरून अंदाज बांधला जातो की हल्ल्याच्या एक आठवडा आधी तो बैसरन परिसरातच उपस्थित होता. एप्रिल 2023 मध्ये पूंछमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्यातही त्याचा सहभाग असल्याचे संकेत आहेत, ज्यात 5 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी हाशिम मुसा आणि अली भाई यांचाही सहभाग असल्याचा संशय सुरुवातीस व्यक्त करण्यात आला होता. मात्र आतापर्यंतच्या तपासात सुलेमानच मुख्य हल्लेखोर असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक दहशतवादी आदिल हुसेन ठोकेर याच्या संलग्नतेबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती मिळालेली नाही.

पहलगाम येथील हल्ला हा 26/11 रोजी मुंबईत झालेल्या जिहादी हल्ल्याच्या धर्तीवर रचण्यात आलेला कट होता. आयएसआय आणि लश्कर-ए-तैयबा यांच्या समन्वयातून, पूर्णपणे पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांच्या सहभागाने हा नरसंहार घडवण्यात आला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसाचा तडाखा; ऑरेंज अलर्ट जारी
Next Article निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा पुढे ढकलली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?