केरळची परिचारिका २०१७ पासून येमेनच्या तुरुंगात साना, 15 जुलै (हिं.स.) :
येमेनमधील
केरळमधील भारतीय परिचारिका निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
निमिषा प्रियाला तिचा व्यावसायिक भागीदार तलाल अब्दो महदीच्या हत्येप्रकरणी १६
जुलै रोजी फाशी देण्यात येणार होती. केरळचे प्रभावशाली सुन्नी मुस्लिम नेते
कंठापुरम ए पी अबुबकर मुसलियार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आणि भारत सरकारच्या
हस्तक्षेपानंतर येमेनमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी निमिषाची
शिक्षा पुढे ढकलली आहे.
भारत
सरकारने निमिषा प्रियाच्या कुटुंबाला दुसऱ्या पक्षासोबत परस्पर सहमतीने तोडगा
काढण्यासाठी अधिक वेळ देण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. भारतीय अधिकारी येमेनच्या
तुरुंग अधिकाऱ्यांशी आणि अभियोक्ता कार्यालयाशी नियमित संपर्कात आहेत. दरम्यान, निमिषा
प्रियावर २०१७ मध्ये तिचा येमेनी व्यावसायिक भागीदार तलाल अब्दो महदीची हत्या
केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तिला २०२० मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात
आली आणि २०२३ मध्ये तिचे अंतिम अपील फेटाळण्यात आले. तिच्या फाशीची तारीख १६ जुलै
२०२५ निश्चित करण्यात आली. सध्या निमिषा येमेनची राजधानी साना येथील तुरुंगात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने निमिषाच्या
मृत्युदंडाच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरही सुनावणी
केली. सर्वोच्च न्यायालयातसरकारच्या वतीने ऍटर्नी जनरल यांनी सांगितले
की, भारत
सरकार प्रियाला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्रियाचा खटला
हाताळणाऱ्या सरकारी वकिलांसह येमेनी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. जोपर्यंत चर्चा
सुरू नाही तोपर्यंत मृत्युदंडाची शिक्षा स्थगित करावी अशी विनंती करण्यात आली होती.दरम्यान, या प्रकरणातसरकारसहकेरळचे प्रभावशाली सुन्नी मुस्लिम नेते
कंठापुरम ए पी अबुबकर मुसलियार यांनीही येमेनमध्ये चर्चा सुरू केली. मुसलियारच्या
माध्यमातूनयेमेनचे एक प्रमुख सूफी विद्वान शेख हबीब उमर बिन हाफिज यांचे
प्रतिनिधी आणि मृत तलाल अब्दो महदी यांच्या कुटुंबात चर्चा झाली. दरम्यान, मुसलियार यांनी जो पर्यंच ही चर्चा
सुरु नाही तोपर्यंत येमेन सरकारला निमिषा प्रियाची फाशी पुढे ढकलण्याची विनंती
केली होती.
