Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला; एक आरोपी अटकेत, चौघांचा शोध सुरू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला; एक आरोपी अटकेत, चौघांचा शोध सुरू

admin
Last updated: 2025/07/23 at 6:36 PM
admin
Share
5 Min Read
SHARE

कॅनबेरा, 23 जुलै – ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड शहरात एका भारतीय विद्यार्थ्यावर पाच जणांच्या टोळक्याने केलेल्या अमानुष हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपी अद्याप पसार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जनतेच्या मदतीचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण भारतीय समुदायात संतापाची लाट उसळली आहे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Contents
२० वर्षीय तरुण अटकेतशनिवारी रात्रीचा थरारधारदार शस्त्राने हल्लापत्नीने केला बचावाचा प्रयत्नभारतीय समुदायात संताप२० वर्षीय तरुण अटकेतशनिवारी रात्रीचा थरारधारदार शस्त्राने हल्लापत्नीने केला बचावाचा प्रयत्नभारतीय समुदायात संताप

२० वर्षीय तरुण अटकेत

एनफिल्ड परिसरातून एका २० वर्षीय स्थानिक तरुणाला अटक करण्यात आली असून, उर्वरित चौघांचा तपास सुरू आहे. अ‍ॅडलेडमधील भारतीय नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत पीडित विद्यार्थी चरणप्रीत सिंग याला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवत आहेत. त्यांनी पोलिस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.

शनिवारी रात्रीचा थरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १९ जुलै) रात्री चरणप्रीत सिंग आपल्या पत्नीसमवेत लाईट शो पाहण्यासाठी कारने निघाला होता. रात्री ९ वाजताच्या सुमारास किंटोर अ‍ॅव्हेन्यूजवळ कार पार्किंगच्या ठिकाणी काही स्थानिक तरुणांशी वाद झाला. या वादाचे रूपांतर वांशिक शिवीगाळीत आणि नंतर हिंसाचारात झाले.

धारदार शस्त्राने हल्ला

चरणप्रीतने सांगितले की,

“ते मला ‘भारतीय पळून जा’ असं ओरडले आणि नंतर अचानक माझ्यावर लाथा आणि मुक्क्यांनी हल्ला केला. मी विरोध केला पण त्यांनी मला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली.”

हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने चरणप्रीतवर वार केले. या प्राणघातक हल्ल्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. रॉयल अ‍ॅडलेड रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

पत्नीने केला बचावाचा प्रयत्न

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये दिसतं की, चरणप्रीत सिंग पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पाच जणांनी त्याच्या चेहऱ्यावर व पोटावर लाथाबुक्क्यांचा वर्षाव केला. त्याची पत्नी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण ती निष्फळ ठरली. हल्ल्यानंतर आरोपी गाडीतून पसार झाले.

भारतीय समुदायात संताप

या घटनेमुळे अ‍ॅडलेडमधील भारतीय समाजात प्रचंड अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अधिक कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

हल्लेखोरांवर कठोर कारवाई होईपर्यंत भारतीय समुदाय शांत बसणार नाही, असा निर्धार अनेकांनी व्यक्त केला आहे.

कॅनबेरा, 23 जुलै – ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड शहरात एका भारतीय विद्यार्थ्यावर पाच जणांच्या टोळक्याने केलेल्या अमानुष हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपी अद्याप पसार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जनतेच्या मदतीचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण भारतीय समुदायात संतापाची लाट उसळली आहे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

२० वर्षीय तरुण अटकेत

एनफिल्ड परिसरातून एका २० वर्षीय स्थानिक तरुणाला अटक करण्यात आली असून, उर्वरित चौघांचा तपास सुरू आहे. अ‍ॅडलेडमधील भारतीय नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत पीडित विद्यार्थी चरणप्रीत सिंग याला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवत आहेत. त्यांनी पोलिस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.

शनिवारी रात्रीचा थरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १९ जुलै) रात्री चरणप्रीत सिंग आपल्या पत्नीसमवेत लाईट शो पाहण्यासाठी कारने निघाला होता. रात्री ९ वाजताच्या सुमारास किंटोर अ‍ॅव्हेन्यूजवळ कार पार्किंगच्या ठिकाणी काही स्थानिक तरुणांशी वाद झाला. या वादाचे रूपांतर वांशिक शिवीगाळीत आणि नंतर हिंसाचारात झाले.

धारदार शस्त्राने हल्ला

चरणप्रीतने सांगितले की,

“ते मला ‘भारतीय पळून जा’ असं ओरडले आणि नंतर अचानक माझ्यावर लाथा आणि मुक्क्यांनी हल्ला केला. मी विरोध केला पण त्यांनी मला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली.”

हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने चरणप्रीतवर वार केले. या प्राणघातक हल्ल्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. रॉयल अ‍ॅडलेड रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

पत्नीने केला बचावाचा प्रयत्न

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये दिसतं की, चरणप्रीत सिंग पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पाच जणांनी त्याच्या चेहऱ्यावर व पोटावर लाथाबुक्क्यांचा वर्षाव केला. त्याची पत्नी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण ती निष्फळ ठरली. हल्ल्यानंतर आरोपी गाडीतून पसार झाले.

भारतीय समुदायात संताप

या घटनेमुळे अ‍ॅडलेडमधील भारतीय समाजात प्रचंड अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अधिक कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

हल्लेखोरांवर कठोर कारवाई होईपर्यंत भारतीय समुदाय शांत बसणार नाही, असा निर्धार अनेकांनी व्यक्त केला आहे.

You Might Also Like

पंतप्रधान मोदी ठरले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ सलग पदावर राहणारे पंतप्रधान

पंतप्रधान मोदी मालदीव दौऱ्यावर; राष्ट्रपती मुइझ्झूंनी केले उबदार स्वागत

‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ शब्द संविधानाच्या प्रस्तावनेतून काढण्याची कोणतीही योजना नाही – कायदा मंत्री मेघवाल

थायलंड-कंबोडिया संघर्षात हिंसाचार शिगेला; १६ मृत, यूएनची आपत्कालीन बैठक

भारताकडून यूएलपीजीएम-व्ही3 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; संरक्षण क्षेत्रात स्वदेशी क्षमतेचा नवा टप्पा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article छावा संघटनेच्या आंदोलनानंतर सुनील तटकरेंना धमकीचे फोन
Next Article गुजरात एटीएसची मोठी कारवाई: अल-कायदाशी संबंधित चार दहशतवादी अटकेत

Latest News

पंतप्रधान मोदी ठरले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ सलग पदावर राहणारे पंतप्रधान
देश - विदेश July 25, 2025
ब्रिटनने दहशतवादी मानसिकतेवर कठोर कारवाई करावी – पंतप्रधान मोदींचे आवाहन
Top News July 25, 2025
सोलापूर जिल्ह्यात ऊस उत्पादकांची कोंडी; साखर कारखान्यांकडे ८५ कोटी रुपये थकीत
Top News July 25, 2025
पंतप्रधान मोदी मालदीव दौऱ्यावर; राष्ट्रपती मुइझ्झूंनी केले उबदार स्वागत
देश - विदेश July 25, 2025
‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ शब्द संविधानाच्या प्रस्तावनेतून काढण्याची कोणतीही योजना नाही – कायदा मंत्री मेघवाल
देश - विदेश July 25, 2025
थायलंड-कंबोडिया संघर्षात हिंसाचार शिगेला; १६ मृत, यूएनची आपत्कालीन बैठक
देश - विदेश July 25, 2025
भारताकडून यूएलपीजीएम-व्ही3 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; संरक्षण क्षेत्रात स्वदेशी क्षमतेचा नवा टप्पा
देश - विदेश July 25, 2025
मराठीत न बोलण्याने भाषेला भोकं पडणार का?” – केतकी चितळेच्या वक्तव्यामुळे वादाचा नवा भडका
महाराष्ट्र July 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?