मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अगदी सर्वसामान्यांपासून राजकीय नेते तसेच चित्रपटसृष्टीतील कलाकारांना सुद्धा कोरोनाची लागण होण्याचे सत्र सुरूच आहे. नुकतंच अभिनेता अर्जुन कपूर याला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. सध्या त्याला कोरोनाची सौम्य लक्षणं असल्याने त्याने घरीच क्वारंटाईन करुन घेतले आहे. घरीच उपचार चालू केले आहेत.
अर्जून कपूर याने पोस्टमध्ये लिहले आहे की, ” मला कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती तुम्हाला देणं हे माझं कर्तव्य आहे. मी स्वतःला घरी क्वारंटाईन करून घेतले आहे. तुम्ही सर्वांनी जो मला पाठिंबा दिला त्यासाठी मी तुमचे आभार मानतो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मी वेळोवेळी तुम्हाला माझ्या प्रकृतीबद्दल माहिती देत राहीन.” अशी पोस्ट अर्जूनने केली आहे. दरम्यान, आपल्या आगामी चित्रपटाच्या शुटींगसाठी तो अभिनेत्री नीना गुप्ता आणि रकुल प्रीत सिंह सोबत फिल्मसिटीमध्ये चित्रीकरण करीत होता. त्याचदरम्यान अर्जुनला कोरोनाची लागणं झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले असून, अर्जुन कपूरला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.