वॉशिंग्टन, 28 जुलै :
अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात प्राथमिक व्यापार करारावर सहमती झाली असून त्यानुसार युरोपियन युनियनमधून येणाऱ्या बहुतांश वस्तूंवर अमेरिका १५ टक्के बेस टॅरिफ लादणार आहे.
या करारात कार, औषधे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचा समावेश असून, अमेरिका या वस्तूंवर लागू होणाऱ्या कराचा नव्याने आढावा घेत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांच्यात स्कॉटलंडमध्ये झालेल्या बैठकीत या कराराची घोषणा करण्यात आली.
कराराची ठळक वैशिष्ट्ये :
-
युरोपियन युनियन पुढील तीन वर्षांत अमेरिका कडून ७५० अब्ज डॉलर (सुमारे ६४ लाख कोटी रुपये) मूल्याची ऊर्जा खरेदी करणार.
-
युरोपियन युनियन अमेरिकेत ६०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असून ती प्रामुख्याने फार्मा, ऑटोमोबाईल आणि संरक्षण क्षेत्रात असणार.
-
दोन्ही पक्षांनी विमान, सुटे भाग, सेमीकंडक्टर उपकरणे, कृषी उत्पादने व जेनेरिक औषधे यावरील शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला.
-
स्टील आणि अॅल्युमिनियमवरील ५०% शुल्क मात्र कायम राहणार.
राजकीय व आर्थिक पार्श्वभूमी :
या करारासाठी अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्ये गेल्या सात महिन्यांपासून वाटाघाटी सुरू होत्या.
युरोपियन युनियनला दिली जाणारी सवलत नाकारल्यास ट्रम्प प्रशासनाने ३०% कर लावण्याचा इशारा दिला होता, त्यानंतर EU ने भूमिका मवाळ करत करार मान्य केला.
महत्त्वपूर्ण आकडेवारी :
-
EU ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असून तिच्या सदस्यांमध्ये युरोपातील २७ देश समाविष्ट आहेत.
-
अमेरिका आणि युरोपियन युनियन यांच्यातील दररोजचा व्यापार सुमारे ३.५ अब्ज डॉलर आहे.
-
मेक्सिको हा सध्या अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.