नांदेड, 1 ऑगस्ट – “मराठवाड्यातील रेल्वे विकासाशी निगडित या महत्वाच्या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानतो,” अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे खासदार व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी नोंदवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ११,१६९ कोटी रुपयांच्या चार रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर–परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरण या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचाही समावेश आहे.
चव्हाण यांनी सांगितले की, केंद्र सरकारने सन २०२८-२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित केले असून, लवकरच या कामाचा शुभारंभ होईल अशी अपेक्षा आहे.