Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रायगड : पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर जीवघेणा भ्याड हल्ला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

रायगड : पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर जीवघेणा भ्याड हल्ला

admin
Last updated: 2025/08/02 at 3:33 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

रायगड, 2 ऑगस्ट – युवा पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. हा हल्ला केवळ एका पत्रकारावर नसून लोकशाही व्यवस्थेवरच केलेला हल्ला असल्याची तीव्र भावना तालुक्यातील सर्व पत्रकारांनी व्यक्त केली आहे.

प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे मित्र मयूर रणदिवे हे नेहमीप्रमाणे चार फाटा येथील ठाकरे उपहारगृहात चहा पिण्यास गेले होते. परतताना कृषी विद्यापीठाच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर एका व्यक्तीने हात करून त्यांना थांबवले. वाटले की, पत्ता विचारायचा आहे, म्हणून ते थांबले; मात्र काही कळायच्या आतच चार-पाच अज्ञातांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

हल्लेखोरांनी हातात फायटर, लोखंडी पाईप आणि धारदार शस्त्रे घेऊन कुडेकर आणि त्यांच्या मित्रावर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. मित्राने धाडसाने मधे पडून कुडेकर यांचे प्राण वाचवले. काही वेळातच घटनास्थळी जमाव जमा झाल्याने हल्लेखोरांनी सिल्व्हर रंगाच्या वॅगनर गाडीतून पलायन केले.

या घटनेनंतर पत्रकार क्षेत्रात संतापाचा उद्रेक झाला. कर्जत प्रेस असोसिएशनचे सदस्य, कायदेशीर सल्लागार ॲड. कैलास मोरे, कोंढाणा टाइम्सचे संपादक रमाकांत जाधव, धर्मेंद्र मोरे, लोकेश यादव, सतीश देशपांडे, माजी नगरसेवक ॲड. संकेत भासे आणि अन्य प्रतिनिधींनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांची भेट घेतली. गुन्हा क्रमांक 199/2025 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला. हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

पत्रकारांनी एकमुखाने हल्ल्याचा निषेध करत पोलिसांना तातडीने कारवाईचे आवाहन केले. कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक किरण नवले तपास करीत आहेत.

पत्रकार सुरक्षा कायदा अंमलात आणावा, हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी आणि प्रकरण गंभीरतेने हाताळावे, अशी मागणी तालुक्यातील पत्रकारांकडून होत आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article परभणी : फकीरा कादंबरीच्या १०५ प्रतींचे वाटप
Next Article देवघरच्या बाबा बैद्यनाथ धाममध्ये ४४ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?