रेल्वेमंत्र्यांना खासदारांची विनंती
छत्रपती संभाजीनगर, 2 ऑगस्ट – भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी शनिवारी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान छत्रपती संभाजीनगर ते मुंबई दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची अधिकृत मागणी करण्यात आली.
याशिवाय, महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रकल्प, स्थानकांची सुधारणा, प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा आणि नव्या योजनांबाबत सविस्तर चर्चा झाली. रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विषयांवर योग्य त्या पातळीवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.