नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (३ ऑगस्ट) अचानक राष्ट्रपती भवनात भेट देत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. याची माहिती राष्ट्रपती भवनाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर फोटोसह दिली.
राष्ट्रपती भवनाने शेअर केलेल्या छायाचित्रात पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू एकत्र दिसत असून, कॅप्शनमध्ये लिहिले आहे – “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.”
या अनपेक्षित भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये विशेष सघन आढावा (SIR) घेण्याच्या विरोधकांच्या मागणीवरून संसदेत निर्माण झालेल्या गतिरोधाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याची चर्चा आहे.
तसेच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून लष्करी उपकरणे आणि कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर २५% कर आणि दंड लावण्याची घोषणा केल्यानंतर काही दिवसांतच पंतप्रधान मोदींची राष्ट्रपती मुर्मू यांच्याशी ही भेट झाली आहे.