वॉशिंग्टन – सॅन फ्रान्सिस्कोहून कोलकातामार्गे मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या एआय-१८० विमानात झुरळ दिसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. दोन प्रवाशांना प्रवासादरम्यान झुरळ दिसल्याने त्यांना दुसऱ्या सीटवर हलवण्यात आले.
एअर इंडियाने स्पष्टीकरण दिले की, विमानांमध्ये नियमित धूर फवारणी केली जाते, परंतु जमिनीवरील ऑपरेशन्सदरम्यान कीटक शिरू शकतात. कंपनीने या घटनेची चौकशी सुरू केली असून, झुरळ कसे आले याचा शोध घेतला जात आहे.
या घटनेनंतर एअर इंडियाने प्रवाशांची माफी मागितली आणि अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
