नांदेड – नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पत्नी सौ. स्नेहलताताई पाटील खतगावकर यांचे दोन दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नांदेडमधील राजेंद्रनगर येथील निवासस्थानी भेट देऊन माजी खासदार खतगावकर यांचे सांत्वन केले.
या वेळी आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार आनंदराव बोंढारकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहसीन खान पठाण, माजी उपमहापौर सुरजितसिंघ गिल, माजी नगरसेवक साबेर चाऊस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.