Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यात पुन्हा पावसाचे आगमन; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

राज्यात पुन्हा पावसाचे आगमन; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

admin
Last updated: 2025/08/05 at 5:05 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, ५ ऑगस्ट – राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील चार दिवसांमध्ये पावसाचा जोर

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ५ ते ८ ऑगस्टदरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम आणि काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार, कोकण-गोवा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातही तुरळक पावसाची शक्यता आहे.

हवामान बदलाची कारणे

अरबी समुद्रात पूर्व-पश्चिम दिशेचा कमी दाबाचा पट्टा आणि तामिळनाडू किनारपट्टीवर तयार झालेले चक्राकार वारे यामुळे राज्यात हवामानात बदल जाणवत आहे.

मुंबईत मात्र उसंत

मुंबई आणि उपनगरांत गेल्या २४ तासांपासून पावसाची विश्रांती असून अंशतः ढगाळ वातावरण आहे. मात्र, इतर भागांतील पावसामुळे राज्यातील तापमानात काहीसा दिलासा मिळणार आहे.

यलो अलर्ट लागू असलेले जिल्हे:

५ ऑगस्ट:

  • विदर्भ: नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली

  • मराठवाडा: नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी

  • दक्षिण महाराष्ट्र: सोलापूर, सांगली

६ ऑगस्ट:

  • विदर्भ: वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

  • मराठवाडा: बीड, परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव

  • दक्षिण महाराष्ट्र: सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग

७ ऑगस्ट:

  • कोकण व पश्चिम महाराष्ट्र: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर

  • मराठवाडा व विदर्भ: नगर (अहिल्यानगर), सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

८ ऑगस्ट:

  • कोकण व पश्चिम महाराष्ट्र: रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर

  • मराठवाडा व विदर्भ: सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

राज्यातील उकाड्याने त्रस्त नागरिकांसाठी हा पाऊस दिलासा देणारा ठरणार आहे. विशेषतः शेतीसाठी आवश्यक असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गालाही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारत जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरणार – मंत्री अतुल सावे
Next Article मुंबई पालिका निवडणुकीत रिपाइंला २५ जागा मिळाव्यात – रामदास आठवले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?