Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गडकरींच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न; महिला पोलिसाचा विनयभंग
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

गडकरींच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न; महिला पोलिसाचा विनयभंग

admin
Last updated: 2025/08/05 at 5:44 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नागपूर, ५ ऑगस्ट – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करत, एका व्यक्तीने महिला वाहतूक पोलिसावर रस्त्यावरच हल्ला करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली. गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवार, ४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ताफा आझमशाह चौकातून शांतीनगरकडे जात असताना, वाहतूक सुरळीत राहावी म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संध्याकाळी सुमारे ६.४५ वाजता दहीबाजार पुलाजवळ दोन महिला वाहतूक पोलीस कर्मचारी कर्तव्यावर होत्या.

त्याचवेळी सैय्यद सज्जाद मुजफ्फर अली (राहणारा – कश्यप कॉलनी, शांतीनगर) हा इसम मालधक्क्याकडून येत होता आणि रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. महिला पोलिसांनी त्याला थांबवले आणि सांगितले, “व्हीआयपी ताफा जात आहे, थांबा.” त्यामुळे संतप्त झालेल्या सैय्यदने महिला पोलिसाला शिवीगाळ केली, धक्काबुक्की करत मारहाण केली.

ताफा निघून गेल्यानंतरही तो थांबला नाही. त्याने महिला पोलिसाच्या अंगावरील शर्ट ओढत तिचा विनयभंग केला आणि तिला ओढत ‘ब्रिज व्ह्यू हॉटेल’पर्यंत नेले. गर्दी असतानाही तो शिवीगाळ आणि मारहाण करत राहिला.

घटनेची माहिती मिळताच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि काही नागरिकांनी हस्तक्षेप केला. मात्र पोलिसांना पाहताच सैय्यदने गर्दीचा फायदा घेत पळ काढला. नागरिकांनी त्याची ओळख पोलिसांना सांगितली.

या प्रकरणी संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘रिपाइं’ ऐक्यासाठी मायावतींनी नेतृत्व करावे – रामदास आठवले
Next Article पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवा – मुख्यमंत्री

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?