मुंबई, ७ ऑगस्ट –
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा केली आहे. रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवली म्हणून भारताला ही कारवाई भोगावी लागत आहे. यामुळे अमेरिकेत भारतातून निर्यात होणाऱ्या अनेक उद्योगांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे भारतावर आता एकूण ५०% टॅरिफ आकारण्यात येणार आहे, ज्यामुळे भारत ब्राझीलच्या पंक्तीत जाऊन पोहोचला आहे. याचा फटका विशेषतः रत्न व दागिने, कापड, चामडे, कोळंबी, रसायने आणि यंत्रसामग्री या क्षेत्रांना बसणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, सर्वात जास्त परिणाम कपडे (१०.३ अब्ज डॉलर), रत्न-दागिने (१२ अब्ज), कोळंबी (२.२४ अब्ज), चामडे-पादत्राणे (१.१८ अब्ज), रसायने (२.३४ अब्ज) आणि यंत्रसामग्री (९ अब्ज) या क्षेत्रांवर होईल. आधीच या क्षेत्रांमध्ये स्पर्धा अधिक व नफा कमी असल्याने अतिरिक्त टॅरिफमुळे निर्यात घट होण्याची शक्यता आहे.
विशेषतः भारतीय कोळंबीवर आधीच २.४९% अँटी-डंपिंग ड्युटी आणि ५.७७% काउंटरवेलिंग ड्युटी आकारली जाते. आता २५% टॅरिफमुळे एकूण शुल्क ३३.२६% पर्यंत वाढेल.
कपड्यांचा व्यवसाय, जो मोठ्या प्रमाणात अमेरिकेवर अवलंबून आहे, त्यालाही मोठा फटका बसेल. भारत अमेरिकेला दरवर्षी ५.९९ अब्ज डॉलर्स किमतीचे कपडे निर्यात करतो, ज्यामध्ये १४% हिस्सा भारताचा आहे. आता या वस्तूंवर ५२.९% (कार्पेट), ६३.९% (विणलेले कपडे) आणि ५१.३% (यंत्रसामग्री) शुल्क आकारले जाणार आहे.
ज्वेलरी आणि हिरे उद्योग देखील यामुळे अडचणीत येऊ शकतात. अमेरिका भारताकडून ४४.५% हिरे आणि १५.६% दागिने आयात करते. या उद्योगांची उलाढाल अनुक्रमे ६.७ अब्ज आणि ३.५ अब्ज डॉलर आहे. नवीन शुल्कामुळे या वस्तू महाग होतील आणि अमेरिकन बाजारात मागणी घटण्याची शक्यता निर्माण झाली आ