जालना, 11 ऑगस्ट –
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील पोलिस उपनिरीक्षकाच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना चंदनझिरा पोलीस ठाणे आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली.
मैनपुरी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात 9 जुलै 2025 रोजी गुन्हा क्रमांक 506/2025 भा. न्या. संहिता 2023 अंतर्गत दाखल करण्यात आला होता. फिर्यादी ध्रुव सिंह लखन सिंह, व्यवसाय पोलिस उपनिरीक्षक, यांनी तक्रार दिली होती की, आयाज अन्सारी, मकसूद अन्सारी आणि फैजान अन्सारी (सर्व रा. गोलाबाजार, मैनपुरी) यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीस फुस लावून बळजबरीने पळवून नेले.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, उत्तर प्रदेश आणि चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पो.उ.नि. मारियो स्कॉट यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली. नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचून आरोपी फैजान मकसूद अन्सारी आणि आयाज मकसूद अन्सारी यांना चंदनझिरा परिसरात ताब्यात घेण्यात आले. चौकशीत अपहरण केलेली मुलगीही सापडली.
दोन्ही आरोपी आणि अल्पवयीन मुलीस पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी कोतवाली पोलीस ठाणे, मैनपुरी येथील पोलीस उपनिरीक्षक दिनेश कुमार यांच्या ताब्यात देण्यात आले.