नवी दिल्ली, 11 ऑगस्ट –
अमेरिकन उद्योजक एलन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार निर्मिती करणाऱ्या टेस्ला कंपनीने भारतातील दुसरे शोरूम नवी दिल्लीत सुरू केले आहे. मुंबईनंतर कंपनीचे हे नवीन टेस्ला एक्स्पिरियन्स सेंटर सोमवारी एरोसिटी वर्ल्डमार्क 3 इमारतीच्या तळमजल्यावर सुरू करण्यात आले.
कंपनीच्या माहितीनुसार, एरोसिटी वर्ल्डमार्क कॉम्प्लेक्समधील हे शोरूम 8,200 चौ. फुटांमध्ये पसरलेले असून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ आहे. हे केंद्र एनसीआरमधील ग्राहकांना सेवा पुरवणार आहे. नवी दिल्लीतील हा परिसर हाय-एंड बिझनेस व हॉस्पिटॅलिटी हब म्हणून प्रसिद्ध आहे, जिथे लक्झरी हॉटेल्स, मोठ्या कंपन्यांची कार्यालये आणि हाय-प्रोफाइल रिटेल स्टोअर्स आहेत.
याआधी, 15 जुलै रोजी, कंपनीने मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील मेकर मॅक्सिटी मॉलमध्ये आपले पहिले भारतीय शोरूम सुरू केले होते.