मुंबई, 12 ऑगस्ट – देशांतर्गत सराफा बाजारात आज घसरणीचा कल दिसून आला. सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम ८०० ते ८८० रुपयांनी घट झाली असून, चांदीच्या दरात प्रति किलो २,००० रुपयांची घसरण झाली आहे.
२४ कॅरेट सोने देशातील बहुतांश बाजारांत प्रति १० ग्रॅम १,०१,४०० रुपये ते १,०१,५५० रुपये या दरम्यान व्यवहारात आहे, तर २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ९२,९५० ते ९३,१०० रुपयांच्या दराने विकले जात आहे. चांदी दिल्ली बाजारात प्रति किलो १,१५,००० रुपये, तर मुंबईत १,१६,७३३ रुपयांवर उपलब्ध आहे.
शहरनिहाय दर –
-
मुंबई : २४ कॅरेट – ₹1,01,400, २२ कॅरेट – ₹92,950
-
दिल्ली : २४ कॅरेट – ₹1,01,550, २२ कॅरेट – ₹93,100
-
अहमदाबाद : २४ कॅरेट – ₹1,01,450, २२ कॅरेट – ₹93,000
-
चेन्नई व कोलकाता : २४ कॅरेट – ₹1,01,400, २२ कॅरेट – ₹92,950
-
लखनौ : २४ कॅरेट – ₹1,01,550, २२ कॅरेट – ₹93,100
-
पटना : २४ कॅरेट – ₹1,01,450, २२ कॅरेट – ₹93,000
-
जयपूर : २४ कॅरेट – ₹1,01,550, २२ कॅरेट – ₹93,100
कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशातील प्रमुख शहरांतही २४ कॅरेट सोने ₹1,01,400, तर २२ कॅरेट सोने ₹92,950 दराने उपलब्ध आहे.