लातूर, 13 ऑगस्ट – केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून जनतेचा भ्रमनिरास झाला असल्याची टीका लातूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने खडकवासला, पुणे येथे आयोजित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेत मान्यवरांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. देशमुख म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस पक्षासाठी मोठे भवितव्य आहे, मात्र त्यासाठी पक्ष संघटन अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. यासाठी आजपासूनच कामाला सुरुवात करण्याचे आवाहन त्यांनी केले.